कोकण

नाचणेतील गाळ व्यवस्थापन प्रकल्प आदर्श

CD

नाचणेत कचऱ्यातून खतनिर्मिती
गावचा आदर्श प्रकल्प ; लातूर पथकाची भेट
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २८ : शहरानजीकच्या नाचणे ग्रामपंचायतीकडून राबवण्यात आलेला मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्प सध्या राज्यासाठी आदर्श ठरत आहे. या प्रकल्पाला राज्यातील विविध भागांतील समूह भेट देऊन माहिती घेत आहेत. लातूर जिल्ह्यातील ४६ जणांच्या पथकाने शनिवारी (ता. २५) प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली.
राज्यामधील ग्रामीण भागातील नाचणे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्प व गोबरधन प्रकल्प राबवण्यात येत आहे. प्रकल्पातून खतनिर्मिती करण्यात येत असून, त्याची विक्री करून ग्रामपंचायतीला आर्थिक हातभार लागला आहे. हा प्रकल्प सध्या राज्यासाठी आदर्श ठरत असून, राज्यातील विविध भागांतून समूह भेट देऊन प्रकल्पाची माहिती घेत आहेत. लातूर जिल्ह्यातील ४६ जणांच्या पथकाने प्रकल्पाला भेट देऊन प्रकल्पाची पाहणी केली. तसेच प्रकल्पाबाबत माहिती जाणून घेतली. या प्रकल्पामुळे कोणत्याही प्रकारचा कसलाही त्रास न होता या प्रकल्पातून खतविक्री होऊन ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे हा प्रकल्प ग्रामपंचायतीसाठी वरदान ठरत असल्याचे उपस्थितांनी सांगितले. या वेळी नाचणे ग्रामपंचायतीचे प्रशासक ऋषिकेश भोंगले, ग्रामविकास अधिकारी जी. के. खरंबळे, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकचा खरा चेहरा पुन्हा उघड! शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्यविधीत दहशतवाद्यांची उपस्थिती; पहलगाम हल्ल्याचा सूत्रधारही दिसला

Mumbai Police: सामूहिक विषप्रयोगाचा कट उधळला! विषाने भरलेल्या १४ हजार ९०० कॅप्सुल्स जप्त; मोहरमच्या मिरवणुकीत धक्कादायक प्रकार

Degloor News : जिल्हा बँकेच्या उमेदवारीसाठी देगलूरात भाजपची चाचपणी; आमदार अमर राजूरकरांचा दौरा

Latest Marathi News Live Update : राम मंदिर देणगीतील अफरातफरीच्या प्रकरणात दोन गुजराती लोक विक्री करण्यात मग्न - काँग्रेस नेते परगट सिंग

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २७ जून २०२६ ते ३ जुलै २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT