40158
विविध विकासकामांचे
वजराट येथे भूमिपूजन
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २८ : वजराट गावात जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या प्रयत्नातून विविध विकासकामे मंजूर झाली आहेत. या विकासकामांची भूमिपूजने श्री. दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.
ग्रामपंचायत वजराट मधील इलेक्ट्रिक २० पोलचे कन्वर्जन करण्यासाठी ५ लाख रुपये निधी, वजराट परबवाडी येथे ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी १७ लाख रुपये निधी, वजराट चव्हाटा मंदिर ते पलतड परबवाडी येथे रस्ता मजबुतीकरण करणे ५ लाख, पिंपळगाव उदवगिरीवाडी येथे रस्ता मजबुतीकरण करणे ५ लाख, वेंगुर्ला पंचायत समिती सेस फंडातून पिंपळगाव शाळा दुरुस्तीसाठी ३ लाख रुपये इत्यादी विकास कामांना मंजुरी मिळाली आहे. या कामांचा शुभारंभ मनीष दळवी व अन्य मान्यवरांच्या हस्ते झाला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, भाजपा तालुका चिटणीस नितीन चव्हाण, प्रमुख गावकर सुर्यकांत पुंडलिक परब, वजराट श्री गिरेश्वर सोसायटीचे माजी चेअरमन बाबुराव ऊर्फ ताता परब, वजराट सोसायटी व्हाईस चेअरमन दत्तात्रय उर्फ अण्णा वजराटकर, माजी सरपंच महेश राणे, माजी उपसरपंच नितीन परब, वामन भोसले, प्रवीण कांदे, वसंत परब, माजी सरपंच रमेश राणे, महेश राणे, राजन परब, सोसायटी संचालक सत्यवान सावंत, निवृत्ती घोणे, मंगेश परब, संदीप पेडणेकर, रविंद्र पालयेकर, निवृत्ती घोणे, मेघश्याम परब, मंगेश परब, शेखर परब, मकरंद गोंधळेकर, संजय केरकर, विजयसिंग परब, जयसिंग देसाई, सत्यवान सावंत आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.