कोकण

पाच हजार जणांनी अनुभवला ऑलिव्ह रिडलेंचा जन्मोत्सव

CD

rat३p२५.jpg
41190
गुहागर ः येथे कासव महोत्सव अनुभवणारे पर्यटक.

41188
यावेळी समुद्रात सोडण्यात आलेली कासवाची पिल्ले.

पाच हजार जणांनी अनुभवला ऑलिव्ह रिडलेंचा जन्मोत्सव

गुहागरात पहिलाच कासव महोत्सव उत्साहात; कासवांच्या प्रजनन दरातही झालीय वाढ

मयूरेश पाटणकर ः सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. ४ : कांदळवन प्रतिष्ठान आणि गुहागर नगरपंचायतीने आयोजित केलेल्या पहिल्याच कासव महोत्सवाला ५ हजार पर्यटकांनी हजेरी लावत ऑलिव्ह रिडले कासवांचा जन्मोत्सव अनुभवला. यावर्षी गुहागरातील कासवांच्या प्रजननाचा दरही ६१.५२ टक्के झाला आहे.
गुहागर शहरातील ७ किलोमीटरच्या समुद्रकिनाऱ्यावर यावर्षी ६ अंडी उबवणी केंद्र (हॅचरी) उभारून कासव संवर्धन मोहीम सुरू झाली. या महिन्यात कासव महोत्सवाचे आयोजन कांदळवन प्रतिष्ठान आणि गुहागर नगरपंचायतीच्यावतीने करण्यात आले होते. कासवमित्रांकडून कासवाची अंडी समुद्रात सोडण्यापूर्वी या उपक्रमाची माहिती देण्यात येत होती. एप्रिल महिन्यातील शनिवार आणि रविवारी समुद्रावर कासवाची पिल्ले पहाण्यासाठी गर्दी झाली.
दरम्यान, गुहागरचा विकास आराखडा त्याचवेळी आला. परिणामी, महोत्सवाची जाहिरातीसह प्रसिद्धी, कासवांचे समुद्रातील जीवन, गुहागरच्या किनाऱ्यावरील संशोधन याची अधिक माहिती असे मुद्दे मागे राहिले.

-----------------------------
असे केले नियोजन
*गुहागर किनाऱ्यावर यावर्षी ६ अंडी उबवणी केंद्र
*१८४ कासवांनी घातलेली १८,९४७ अंडी संरक्षित
*सर्वाधिक अंडी फेब्रुवारी, मार्च या कालावधीतील
*एप्रिलमध्ये रोज पिल्ले अंड्यातून बाहेर येणार हे निश्चित
*पिल्ले सोडायची माहिती देण्यासाठी व्हॉटसॲप ग्रुप
*पर्यटकांना ग्रुपमध्ये सामील करून घेतले जात होते
*ग्रुपवर ६ उबवणी केंद्रांची गुगल मॅप लोकेशनची लिंक
*पर्यटकांना नेमक्या जागी जाणे सहज शक्य झाले

---------------------------
चौकट
कांदळवन कक्षाला श्रेय
गेल्या १० वर्षांतील संकलीत अंडी व सोडण्यात येणारी पिल्ले यांचा विचार केला, तर गुहागर किनाऱ्यावरील कासवांच्या प्रजननाचा दरही वाढला आहे. सुरुवातीला १०० अंड्यांपैकी केवळ २५ ते ३० कासवांची पिल्ले येत होती. आता हाच दर ६१.५२ टक्के झाला आहे. इथे झालेले संशोधन, कांदळवन कक्षाने अंडी संवर्धनाची बदललेली प्रक्रिया याचा सकारात्मक परिणाम झाला.
--------------------------------
चौकट

‘कुर्माख्यान’ भावले...
कासव महोत्सवात कासवाचे महत्त्व विषद करणाऱ्या ‘कुर्माख्यान’ या नाटकाचा पहिला प्रयोग गुहागरमध्ये करायचा ठरला होता. हा नाट्यप्रयोग २४ तारखेला झाला. विनोद, माहिती आणि ठेका धरायला लावणारी गाणी यांचा सुरेख संगम असलेला हा नाट्यप्रयोग लोकांना भावला.

-----------------------------------
कोट
इवलीशी पिल्ले समुद्रात जातानाचे एक विलक्षण दृश्य आम्हाला पाहता आले. कासवांची पिल्ले अशा प्रकारे जन्म घेतात हेच माहिती नव्हते. येथील कासवमित्र खूप मेहनत घेऊन तन्मयतेने हे काम करीत आहेत. पुढच्यावर्षी मित्रमंडळी परिवारासह इथे कासवाची पिल्ले पाहण्यासाठी येणार आहे.
- प्रकाश लसणे, भिवंडी

----------

चौकट १
दृष्टिक्षेपात कासव संवर्धन मोहीम

हॅचरी क्र. *घरट्यांची संख्या *अंड्यांची संख्या *समुद्रात सोडलेली पिल्ले *जन्मप्रमाण (टक्के)
१ *३९ *४०२७ *२३९७ *५९.५२
२ *४० *४०४५ *१६४५ *४०.६६
३ *४९ *५०५४ *३४८७ * ६८.९९
४ *१७ *१६८७ *१३७८ *८१.६८
५ *१८ *१९१७ *१०६८ *५५.७१
६ *२१ *२२०७ *१३८१ *६२.५७
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: अमित शहांचं भाषण सुरू असताना पवनराजे निंबाळकर हत्येचा निकाल, एक फोन अन्‌ शिंदे ताडकन उठले

Father's Day Wishes in Marathi: "न बोलता प्रेम व्यक्त करणारा व्यक्ती म्हणजे बाबा!" फादर्स डे निमित्त बाबांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि प्रेमळ संदेश!

Arabian Sea Cyclonic Circulation : अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती, २५ जूनपासून पावसाला होणार सुरूवात; १ जुलैपासून मॉन्सून पूर्णपणे सक्रिय

FIFA World Cup 2026: अमेरिकेची विश्वकरंडकात धडाकेबाज एंट्री! ऑस्ट्रेलियाचा पराभव करून थेट बाद फेरीत

Yoga Day Wishes in Marathi: योग म्हणजे स्वतःशी जोडणारा सर्वात सुंदर संवाद! योग दिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना पाठवा खास मराठी शुभेच्छा आणि प्रेरणादायी संदेश!

SCROLL FOR NEXT