रॉकेलच्या वितरणाबाबत संभ्रम
राजापूर तालुका; १.४५ लाख लिटर मागणी, ७ हजार ५०० लिटर मंजूर
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ४ : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे गॅस सिलिंडर उपलब्ध होण्यामध्ये अडचणी येत आहेत. अशा स्थितीमध्ये केंद्र शासनाच्या सूचनेनुसार, राज्य शासनाकडून अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबधारक शिधापत्रिकांना प्रतिमहिन्याला तीन लिटर केरोसीन वितरित करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार तालुक्यातून सुमारे १ लाख ४५ हजार ७८८ लिटर रॉकेलची मागणी नोंदवलेली असताना सुमारे ७ हजार ५०० लिटर रॉकेल मंजूर झाले असून, त्याचे तब्बल ४८ हजार शिधापत्रिकाधारकांना वितरण नेमके करायचे कसे? असा यक्षप्रश्न तालुका पुरवठा विभागासमोर ठाकला आहे. आखाती देशांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धाचा प्रतिकूल परिणाम होऊ लागला आहे. त्यातून, आखाती देशामधून गॅस सिलिंडर कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याचे त्याचा सगळीकडे तुटवडा जाणवू लागला आहे. याचा सर्वाधिक फटका हॉटेल व्यावसायिकांना बसून अनेकांनी गॅस सिलिंडरअभावी हॉटेल व्यवसाय बंद केले आहेत. साऱ्यांसमोर इंधनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. असे असताना केंद्र शासनाने रास्त धान्य दुकानांच्या माध्यमातून शिधापत्रिकाधारकांना केरोसीन वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबधारक शिधापत्रिकांना प्रतिमहिन्याला तीन लिटर केरोसीन वितरित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार तालुक्यातून सुमारे १ लाख ४५ हजार ७८८ लिटर रॉकेलची मागणी नोंदवलेली होती; मात्र, प्रत्यक्षात सुमारे ७ हजार ५०० लिटर रॉकेल मंजूर झाल्याची माहिती पुरवठा विभागातून देण्यात आली. केरोसीन कोटा मंजूर झाला असला तरी, प्रत्यक्षात अद्यापही तालुक्यामध्ये केरोसीन उपलब्ध झालेले नसल्याचेही पुरवठा विभागातून स्पष्ट करण्यात आले.
---
शिधापत्रिका नसलेल्या कुटुंबांना दिलासा
ज्या कुटुंबाकडे शिधापत्रिका नाहीत; पण ते गरजू आहेत अशांना ग्रामपंचायतींच्या निवासी पुराव्याच्या आधारे केरोसीन मिळण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे युद्धजन्य स्थितीमुळे गॅस सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने इंधनाचा तुटवडा निर्माण झालेला केरोसीन उपलब्धतेमुळे इंधनाचा प्रश्न निकाली निघणार आहे.
-----
दृष्टिक्षेपात राजापूर
* लाभार्थी शिधापत्रिका ः ४८ हजार ५८८
* रॉकेल वितरण ः प्रति शिधापत्रिका ३ लिटर
* रॉकेलची मागणी ः १ लाख ४५ हजार ७८८ लिटर
* मंजूर रॉकेल ः ७ हजार ५०० लिटर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.