कोकण

साळिस्ते गुरववाडी येथे मंगळवारी ''कलगी-तुरा''

CD

साळिस्ते गुरववाडी येथे
मंगळवारी ‘कलगी-तुरा’
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. ४ : साळिस्ते गुरववाडी येथे श्री सत्यनारायण महापूजेनिमित्त १२ मे रोजी रात्री १० वाजता लोककलेचा ऐतिहासिक वारसा असलेल्या ‘कलगी-तुरा’ (शक्ती-तुरा) या डबलबारी भजनाचा जंगी महामुकाबला आयोजित केला आहे. साळिस्ते गुरववाडी ग्रामस्थ मंडळ आणि श्री खांबेश्वर सेवा मित्रमंडळ, गुरववाडी यांच्यावतीने हा कार्यक्रम होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रथमच रत्नागिरी जिल्ह्यातील दोन नामवंत शाहिरांमध्ये हा सामना रंगणार आहे. या महामुकाबल्यात ''कलगी'' पक्षाचे नेतृत्व शाहीर राजेश निकम (सवणे, खेड) करणार आहेत. ते प्रसिद्ध सदालाल घराण्याचे वारसदार असून उस्ताद शाहीर विजय निकम आणि दौलत निकम यांचे शिष्य आहेत. त्यांच्या सोबतीला नृत्य कला गायन कलापथक, खोंडे (जोगळेवाडी) यांची साथ लाभणार आहे, तर ''तुरा'' पक्षाचे प्रतिनिधित्व शीघ्रकवी वासुवाणी यांचे पट्टशिष्य शाहीर सचिन धुमक (ढाकमाली, चिपळूण) करणार आहेत. ते बाळू रेंगेले घराण्याचे असून त्यांनी लोकशाहीर मधुकर पंदिरे आणि शाहीर तुषार पंदिरे यांच्याकडून मार्गदर्शन घेतले आहे. त्यांना श्रीराम कृपा नृत्य कलापथक, आठघर (बलेकरवाडी, कांबळे लाबगण) यांची साथ लाभणार आहे. या महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन साळिस्ते गुरववाडी ग्रामस्थ मंडळ आणि श्री खांबेश्वर सेवा मित्रमंडळ, गुरववाडी यांच्या वतीने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs SA W:भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Omprakash Raje Nimbalkar : "१०० कोटी हवेत तर आमच्या किडन्या विकू, पण पक्षांतर करू नका"; उमरग्यातील शिवसैनिकांचे ओमप्रकाश राजेनिंबाळकरांना हृदयद्रावक पत्र

Omraje Nimbalkar: दिल्लीतून फोन; धाराशिवमध्ये घोषणा! पक्षबदलाच्या निर्णयामागे नेमके काय घडले? ओमराजेंनी प्रथमच सांगितली पडद्यामागची कथा

T20 WC, IND W vs SA W : स्मृती-शफालीची तुफान सुरुवात, पण द. आफ्रिकेने आवळले फासे; तरीही टीम इंडिया दीडशे पार

विश्वासावर प्रश्नचिन्ह, विकासाची कोंडी, सत्तेची गरज...; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील बंडखोर खासदाराने पक्ष सोडण्याची कहाणी सांगितली!

SCROLL FOR NEXT