

Shafali Verma | India vs South Africa | Women's T20 World Cup 2026
Sakal
Women's T20 World Cup 2026, IND vs SA: महिला टी२० लीग २०२६ स्पर्धेत रविवारी (२१ जून) भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघात अत्यंत महत्त्वाचा सामना सुरू आहे. या सामना जिंकणारा संघ सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी प्रबळ दावेदारी ठोकू शकतो.
या सामन्यात सुरुवातीपासूनच रोमांच पाहायला मिळत आहे. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भारतावर वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न केला, पण भारतीय संघानेही दीडशे धावांचा टप्पा पार करण्यात यश मिळवले आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर १५९ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.