T20 WC, IND W vs SA W: भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

T20 World Cup 2026 India Women vs South Africa Women : महिला टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेकडून पराभवाचा धक्का बसला आहे. भारतासाठी मारिझान कापचे सर्वात मोठे आव्हान ठरले. तिने गोलंदाजीसोबतच फलंदाजीतही महत्त्वाचे योगदान दिले.
Marizanne Kapp | India vs South Africa | Women's T20 World Cup 2026

Marizanne Kapp | India vs South Africa | Women's T20 World Cup 2026

Sakal

Updated on

Women's T20I World Cup 2026, IND W vs SA W: महिला टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत रविवारी (२१ जून) भारतीय महिला संघाला पराभवाचा मोठा धक्का बसला. दक्षिण आफ्रिका महिला संघाने भारतीय महिला संघाला मँचेस्टरमध्ये झालेल्या सामन्यात ६ विकेट्सने पराभूत केले आहे. दक्षिण आफ्रिकेचा हा तीन सामन्यांतील दुसरा विजय आहे, तर भारतीय संघाचा तीन सामन्यांतील पहिलाच पराभव आहे. मात्र आता अ गटात चूरस निर्माण झाली आहे.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेसमोर भारताने १५९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग दक्षिण आफ्रिकेने १९.१ षटकात ४ विकेट्स गमावत १६१ धावा करत सहज पूर्ण केला. दक्षिण आफ्रिकेच्या विजयात अष्टपैलू मारिझान कापने मोलाचा वाटा उचलला. तिने महत्त्वाच्या विकेट्स घेण्यासोबतच मॅचविनिंग अर्धशतक केले. भारताला या सामन्यात झेल घेण्याच्या संधी सुटल्याचाही फटका बसला.

Marizanne Kapp | India vs South Africa | Women's T20 World Cup 2026
T20 WC, IND W vs SA W : स्मृती-शफालीची तुफान सुरुवात, पण द. आफ्रिकेने आवळले फासे; तरीही टीम इंडिया दीडशे पार
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com