कोकण

खानोलीच्या निशा केळकर यांची वैज्ञानिक निरीक्षकपदी निवड

CD

swt69.jpg
41777
निशा केळकर


खानोलीच्या निशा केळकर यांची
वैज्ञानिक निरीक्षकपदी निवड
ऑलिंपियाड'' परीक्षा : जागतिक स्तरावर संधी
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ६ : खानोली येथील सुकन्या असलेल्या रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापिका निशा केळकर यांची भारत सरकारतर्फे जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित ‘ऑलिंपियाड’ परीक्षेसाठी ‘वैज्ञानिक निरीक्षक’ म्हणून निवड झाली आहे. अमेरिकेतील कोलंबिया येथे ४ ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे.
जागतिक स्तरावरील ही ऑलिंपियाड स्पर्धा दरवर्षी वेगवेगळ्या देशांत आयोजित केली जाते. यावर्षी या परीक्षेचे यजमानपद अमेरिकेतील ‘कोलंबिया’ या शहराकडे असून, जगातील ७५ देशांतील प्रज्ञावंत विद्यार्थी यामध्ये सहभागी होणार आहेत. या परीक्षेतून सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांसह विशेष पुरस्कारांसाठी सर्वोत्तम विद्यार्थ्यांची निवड केली जाते.भारतात या परीक्षेचे सर्व नियोजन मुंबईतील ‘होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन’ (एचबीसीएसई) या संस्थेमार्फत केले जाते. देशातील १२ वीच्या विद्यार्थ्यांमधून राष्ट्रीय स्तरावर कठोर निवड चाचणी घेऊन केवळ ५ सर्वोत्तम विद्यार्थ्यांची निवड जागतिक स्तरासाठी केली जाते. या चमूचे नेतृत्व आणि तांत्रिक देखरेख करण्यासाठी केळकर यांची ''वैज्ञानिक निरीक्षक'' म्हणून झालेली निवड महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
निशा या मूळच्या खानोली येथील असून, त्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात ‘सहाय्यक प्राध्यापिका’ तसेच गेल्या १० वर्षांपासून होमी भाभा सायन्स सेंटरमध्ये ‘रिसोर्स पर्सन’ म्हणून कार्यरत आहेत. सध्या त्या मुंबई येथील ‘इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ मधून आपली पीएच. डी. पूर्ण करत आहेत. त्या वेंगुर्ले मेडिकल कॉलेजचे प्राचार्य के. जी. केळकर यांच्या त्या भगिनी आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: 11 हजारांनी घसरल्यानंतर सोन्याने घेतला U-Turn! ग्राहकांना मोठा झटका? जाणून घ्या आजचा ताजा भाव

Anna Hazare Praises Tukaram Mundhe : "अशा डॅशिंग अधिकाऱ्यांची देशाला गरज"; तुकाराम मुंढेंच्या 'त्या' धडक मोहिमेवर अण्णा हजारे खूश, केलं तोंडभरुन कौतुक

Latest Marathi News Live Update : केतन अग्रवाल हत्याकांत प्रकरणात सियाच्या दोन मैत्रीणींकडेही चौकशी होणार

सरकारी रुग्णालयात प्रसुती झाल्यास मिळणार सोन्याची अंगठी, राज्य सरकारचा मोठा निर्णय...

TrashBot : बारावीच्या विद्यार्थिनीने बनवला अद्भुत 'ट्रॅशबॉट' रोबो; कचरा बघताच पळत जाऊन करतोय साफसफाई, पाहून तुमचं डोकं चक्रावेल

SCROLL FOR NEXT