रिक्षा संघटनेकडून
मेहेक रेडीजचा सत्कार
संगमेश्वर ः तालुक्यातील कडवई पंचक्रोशी शिक्षण मंडळ संचलित भाईशा घोसाळकर हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी मेहेक रेडीज ही बारावी परीक्षेत ९०.५० टक्के गुण मिळवून संगमेश्वर तालुक्यात प्रथम आली. याबद्दल रिक्षामालक-चालक संघ कडवई, तुरळ, चिखली यांच्यावतीने कडवई बाजारपेठ येथे तिचा सत्कार करण्यात आला. या वेळी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष मिलिंद चव्हाण, सदस्य आत्माराम मयेकर, यशवंत कुंभार, योगेश टेम्बे, सचिन मयेकर, विश्वनाथ साळुंके, सुजित इंजले आदी उपस्थित होते.
धनश्री जोशी यांनी
स्वीकारला पदभार
साखरपा : कोंडगाव येथील नवनिर्वाचित सरपंच धनश्री जोशी यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी भाजपच्या उमेदवार रूपाळी कीर यांचा पराभव करत विजय मिळवला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि प्रतिमापूजन करून त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. या वेळी उपसरपंच तसेच प्रभारी सरपंच श्रद्धा शेटये यांनी त्यांना सन्मानाने सरपंचांच्या खुर्चीत बसवले आणि त्यांचा सन्मान केला. या प्रसंगी जोशी म्हणाल्या, हे पद अल्पावधीसाठी असले तरी या कालावधीत पारदर्शक कारभार करू.
गटविकास अधिकारी
शिंदे यांचा सत्कार
साखरपा ः संगमेश्वर (देवरूख) पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी विनोदकुमार शिंदे यांना चक्रभेदी सोशल फाउंडेशनतर्फे सत्कार करून शुभेच्छा देण्यात आला. ते नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या शुभेच्छा समारंभाला चक्रभेदी सोशल फाउंडेशन संस्थेच्या संस्थापिका वैदेही सावंत उपस्थित होत्या. शिंदे यांच्या संगमेश्वर पंचायत समितीतील कार्यकाळात त्यांचे चक्रभेदीला मोलाचे सहकार्य मिळाल्याचे त्या म्हणाल्या. आंतरराष्ट्रीय विधवा दिन, विधवा महिलांना टी स्टॉल वाटप, मायेचे हक्काचे घर अशा उपक्रमांना शिंदे यांचे सातत्याने सहकार्य मिळत राहिल्याचे सावंत यांनी सांगितले. पती निधनानंतर कुंकू पुसणे, बांगड्या फोडणे, जोडवी काढणे आशा अनिष्ट प्रथांना शिंदे यांनी कायम विरोध केला. या प्रथा बंद होऊन विधवा आणि एकल महिलांना समाजात सन्मानाचे स्थान मिळावे यासाठी चक्रभेदी फाउंडेशनने उचललेल्या प्रत्येक पावलाला शिंदे यांनी पाठिंबा आणि सहकार्य दिल्याचे वैदेही सावंत म्हणाल्या.
विवेक पाटील यांचा
ठाकरे सेनेतर्फे सत्कार
रत्नागिरी : शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विवेक पाटील यांना नुकतेच पोलिस महासंचालक पदक प्रदान करण्यात आले. त्या निमित्त त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने सत्कार करण्यात आला. या वेळी रत्नागिरी शहरप्रमुख प्रशांत साळुंके, उपशहरप्रमुख नितीन तळेकर, विभागप्रमुख सलील डाफळे, संदेश भिसे, साजिद पावसकर, प्रशांत सुर्वे, शांताराम नारकर उपस्थित होते.