swt713.jpg
41990
मळगाव ः हायस्कूलच्या इमारतीचे छप्पर दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले.
छप्पर दुरूस्तीसाठी माजी विद्यार्थी एकवटले
मळगाव हायस्कूलचे काम युद्धपातळीवर; पहिल्या टप्प्यात तीन वर्गखोल्या
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ७ ः तालुक्यातील मळगाव इंग्लिश स्कूल, मळगाव शाळेच्या पुढील तीन वर्गखोल्यांच्या छप्पर दुरुस्तीच्या कामास सुरुवात करण्यात आली. हे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. शाळेचे जुने लाकडी छप्पर जीर्ण झाल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ते बदलून लोखंडी छप्पर उभारणे अत्यावश्यक बनले होते.
या पार्श्वभूमीवर मळगाव इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थी परिवारातर्फे शाळेच्या छप्पर दुरुस्तीसाठी मदतीचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला माजी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद दिला. विविध बॅचच्या माध्यमातून देणगी स्वरुपात सहकार्य मिळत आहे. या देणगीतूनच शाळेच्या छप्पर दुरुस्तीचे काम प्रत्यक्षात सुरू केले आहे. गेल्यावर्षी तीन वर्गखोल्यांच्या छप्पर दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले होते. यावर्षी आणखी तीन वर्गखोल्यांचे काम हाती घेण्यात आले असून, त्यापैकी एका वर्गखोलीचे संपूर्ण छप्पर दुरुस्ती व वर्गखोली नूतनीकरणाचे काम शाळेच्या १९९३-९४ बॅचकडून करण्यात येणार आहे, ही बाब विशेष उल्लेखनीय आहे.
शाळेचे संपूर्ण लाकडी छप्पर खराब अवस्थेत असल्याने टप्प्याटप्प्याने संपूर्ण शाळेचे छप्पर दुरुस्त करण्याचा संकल्प माजी विद्यार्थी परिवाराने केला आहे. ''माझी शाळा-सुंदर शाळा'' या भावनेतून सर्व माजी विद्यार्थी बंधू-भगिनींनी जास्तीत जास्त देणगी देऊन या उपक्रमात आपला खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन माजी विद्यार्थी परिवारातर्फे करण्यात आले आहे. हा उपक्रम केवळ इमारत दुरुस्तीचा नसून, शाळेशी असलेले नाते, ऋण आणि सामाजिक बांधिलकी जपणारा आदर्श उपक्रम ठरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.