swt1115.jpg
42803
कुडासे : सरस्वती विद्यामंदिरच्या स्नेहसंमेलनात मार्गदर्शन करताना प्रा. दिलीप बेतकेकर. सोबत अध्यक्ष अॅड. नकुल पार्सेकर, रवींद्र भागवत, संदेश तळणकर आणि मुख्याध्यापक जालिंदर शेंडगे.
कुडासे येथे माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन
कोलझर : "पूर्वीच्या शाळा या केवळ सिमेंट-काँक्रीटच्या इमारती नव्हत्या, तर त्या विद्यार्थ्यांना घडवणारी संस्कार केंद्रे होती. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मुलांच्या उर्जेला सकारात्मक दिशा देण्यासाठी मूल्यशिक्षणाची आणि शुद्ध आचरणाची नितांत गरज आहे," असे प्रतिपादन विद्याभारतीचे ज्येष्ठ कार्यकर्ते व समुपदेशक दिलीप बेतकेकर यांनी केले. कुडासे येथील सरस्वती विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेजच्या माजी विद्यार्थी संघाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी नकुल पार्सेकर होते. यावेळी माजी विद्यार्थी संघाचे सचिव दत्तप्रसाद देसाई म्हणाले, "संघाने लोकसहभागातून शाळेसाठी सुमारे १८ लाख रुपयांचा निधी उभारला असून, त्याद्वारे विविध भौतिक सुविधा निर्माण केल्या आहेत. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी माजी विद्यार्थी यापुढेही जोमाने काम करतील." शाळेचे पदाधिकारी दादा देसाई आणि अध्यक्ष संदेश तळणकर यांनी शाळेच्या यशाचा आलेख मांडला. प्रकाश कुडासकर, संतोष देसाई, रामदास मेस्त्री, नंदकिशोर नाईक, उपस्थित होते. सूत्रसंचालन श्री.देसाई यांनी तर मुख्याध्यापक जालिंदर शेंडगे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.