कोकण

खासदार विनोद तावडे यांचा आज कणकवलीत सत्कार

CD

42921

खासदार विनोद तावडे यांचा
आज कणकवलीत सत्कार

ओरोस, ता. ११ : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस, नवनियुक्त राज्यसभा खासदार विनोद तावडे मंगळवारी (ता.१२) जिल्ह्यात येत आहेत. त्यांचा भाजपतर्फे स्वागत आणि सत्कार सोहळा दुपारी ३ वाजता प्रहार भवन, कणकवली येथे होणार आहे, अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली.
सावंत म्हणाले, खासदार नारायण राणे यांच्या हस्ते, पालकमंत्री नीतेश राणे, आमदार प्रमोद जठार, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार अजित गोगटे यांच्या उपस्थितीत स्वागत होईल. कर्मावर आणि प्रामाणिकपणावर निसंकोच विश्वास ठेवला, तर योग्य वेळ आली की, यश समोर येऊन उभे राहते, यांचे उत्तम उदाहरण खासदार तावडे आहेत. अभाविपपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास त्यांना एक शिस्तबद्ध संघटन कौशल्य देऊन गेला. कार्यकर्त्यांशी संवाद ही त्यांची कुशलता आहे. त्याचा कार्यकर्त्यांशी थेट संवाद असतो. पक्षाची विचारधारा तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. दहा वर्षांपूर्वी युतीमुळे तिकीट नाकारले गेले. तरीही पक्षाची विचारधारा सोबत घेऊन पक्षाने दिले ते काम केले. आजही लोकांच्या मनात त्यांनी शिक्षण, उच्च तंत्र शिक्षणमंत्री म्हणून केलेलं कार्य स्मरणात आहे. त्यांच्या कार्यकाळात विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करणे, मराठी शाळांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर आणि शिक्षण क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Online Classes Appeal: ''शाळांनी ऑनलाईन क्लासेस घ्यावेत'', पंतप्रधान मोदींचं आवाहन

PBKS vs DC Live: प्रियांश आर्यचा पहिल्याच चेंडूवर कल्ला... स्टार्कला हाणला Six! नोंदवला भारी विक्रम, अक्षर पटेल स्तब्ध... Video Viral

New Railway Route : रेल्वेगाड्यांचा वेग वाढणार! कसारा-मनमाड नव्या रेल्वेमार्गिकेसाठी सर्वेक्षण

रासायनिक भेसळीवर राज्य सरकारचा दणका, दोषी व्यापाऱ्यांचे परवाने रद्द होणार

PBKS vs DC Live: दिल्ली कॅपिटल्सने प्लेइंग इलेव्हनमध्ये ५ बदल केले, पण Prithvi Shaw ला नाही खेळवले; पंजाब किंग्सच्या ताफ्यातही बदल

SCROLL FOR NEXT