

Ireland Women Viral Cricket Celebration | IND vs IRE 1st T20I
Sakal
India vs Ireland 1st T20I : शुक्रवारी (२६ जून) आयर्लंडच्या पुरुष क्रिकेट संघाने इतिहास घडवला. टी२० वर्ल्ड कप चॅम्पियन असलेल्या भारतीय संघाला टी२० मालिकेतील पहिल्या सामन्यात आयर्लंडने ३४ धावांनी पराभूत केले. यामुळे दोन सामन्यांच्या टी२० मालिकेत आयर्लंडने १-० अशी आघाडी घेतली आहे. यासोबतच ते ही मालिका गमावणार नाहीत, याचीही त्यांनी खात्री केली.
इतकेच नाही, तर आयर्लंडचा हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भारताविरूद्धचा पहिलाच विजय होता. त्यामुळे त्यांच्यासाठी हा विजय ऐतिहासिक ठरला. आयर्लंडचा हा विजय त्यांच्या महिला संघानेही साजरा केला केला.