कोकण

लांजा तालुक्यात तीन दिवसांपासून वीजेचा लपंडाव

CD

26O43098
एआय चित्र
लांजा तालुक्यात विजेचा लपंडाव सुरूच
पावसाचा महावितरणला फटका; दहा गावे अंधारात, जनजीवन विस्कळीत
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. १२ ः तालुक्यात शनिवारी झालेल्या विजांच्या कडकडाटासह वादळी पावसामुळे महावितरणच्या यंत्रणेचे मोठे नुकसान झाले असून, तब्बल ४८ तास उलटूनही अनेक भागांतील वीजपुरवठा पूर्ववत झालेला नाही. शहरातील काही वाड्या आणि तालुक्यातील दहा गावांतील नागरिक अद्याप अंधारात असून, सततच्या वीज खंडिततेमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
लांजा तालुक्यात शनिवारी अवकाळी पावसासह झालेल्या वादळीवाऱ्याने मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर वीजखांब व तारा तुटल्याने तालुक्यात अंधाराचे साम्राज्य पसरले. नुकसानीचे पंचनामे अद्याप सुरू असून, महावितरणला सर्वाधिक फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे. महावितरणचे कर्मचारी आणि ठेकेदार युद्धपातळीवर दुरुस्तीची कामे करत असले तरी वीजपुरवठा सुरळीत करण्यात अद्याप यश आलेले नाही. शहरातील काही भागांत वीजपुरवठा सुरू झाला असला तरी वारंवार खंडित होणाऱ्या विजेमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कोत्रेवाडी, आगरवाडी, कनावजेवाडी यांसह वाडगाव, बेनी, हसोळ, शिपोशी, निवोशी, रावारी, वेरवली, जावडे, माजळ, कुवे आणि वाकेड परिसरातील काही भाग अजूनही अंधारात आहेत.
----
ग्रामीण भागातील पाणीयोजना बंद
वीज नसल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला असून, ग्रामीण भागातील नळपाणी योजना बंद पडल्या आहेत. मोबाईल चार्जिंग, फ्रीज, डीप फ्रीजसारखी उपकरणे बंद असल्याने नागरिकांसह हॉटेल व आइस्क्रीम व्यावसायिकांचे मोठे हाल होत आहेत. उकाड्याच्या दिवसांत वीज नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
---
ग्राहकांना सहकार्य करा
या दुरुस्तीकाळात महावितरणने ग्राहकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. ही हानी मोठी असल्याने अनेक भागात वाडीत किंवा शेतात विजेचे खांब पडलेले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना सर्व ठिकाणी एकाच वेळी पोहचणे अशक्य होते. वीज पुरवठा पूर्णतः सुरळीत होण्यासाठी काही कालावधी लागू शकतो, असे आवाहन महावितरणने केले आहे.
---
खाली पडलेल्या वीजवाहिन्यांपासून दूर रहा
नागरिकांनी तुटलेल्या किंवा जमिनीवर पडलेल्या वीजवाहिन्यांपासून सुरक्षीत अंतर राखावे, तसेच अशा प्रकारच्या घटना आढळल्यास तात्काळ महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून माहिती द्यावी असे आवाहनही महावितरणकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Import Duty Hike in India : सोनं-चांदीसह मौल्यवान धातू महागणार! मध्यरात्री केंद्र सरकारचा मोठा निर्णय...

Maharashtra Doctor Transfers: राज्यातील ९०० डॉक्टरांच्या बदलीच्या आदेशाने उडाली खळबळ; मूळ पदावर होणार रवानगी, सोयीच्या ठिकाणी वशिल्याने गेलेल्यांना दणका

निदा खानला मदत करणाऱ्या नगरसेवक मतीन पटेलच्या मालमत्तेवर महापालिकेचा बुलडोजर; पत्नी अन् मुलीने फुलं देऊन केलं स्वागत

Shreyas Iyer: गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांच्या चुका पंजाबला महागात; श्रेयस अय्यर संतापला; २१० धावाही अपुऱ्या ठरल्या! दिल्लीकडून पंजाबचा थरारक पराभव

IMD monsoon forecast update अंदमानात मॉन्सूनची चाहूल, चार-पाच दिवसांत आगमन; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

SCROLL FOR NEXT