कोकण

पाटगाव घाटातील रस्ता रुंदीकरण अखेर सुरू

CD

- rat१३p८.jpg-
26O43197
देवरूख ः देवरूख-रत्नागिरी मार्गावरील पाटगाव घाटातील रखडलेल्या रुंदीकरणाला सुरुवात झाली आहे.
----
सकाळ बातमीचा परिणाम---लोगो

पाटगाव घाटातील रस्ता रुंदीकरण सुरू
सकाळ वृत्तसेवा
देवरूख, ता. १३ ः देवरूख-रत्नागिरी या राज्यमार्गावर प्रवासाचा आनंद लुटणाऱ्या प्रवाशांसाठी पाटगाव घाटी मात्र ‘ब्लॅक स्पॉट’ ठरत आहे. गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या घाटातील रस्ता रुंदीकरणाच्या प्रश्नामुळे अपघातांचे सत्र सुरूच होते. मात्र, या गंभीर समस्येकडे ‘सकाळ’ने लक्ष वेधल्यानंतर मंगळवारपासून रुंदीकरणाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.
चार वर्षांपूर्वी या राज्यमार्गाचे डांबरीकरण करण्यात आले होते. विशेष म्हणजे, या संपूर्ण मार्गावर गेल्या चार वर्षांत एकही खड्डा पडलेला नाही, जे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाच्या उच्च दर्जाचे प्रतीक मानले जाते. मात्र, संपूर्ण रस्ता सुस्थितीत असताना केवळ पाटगाव घाटीतील काही अंतराचे काम रखडले होते. या अरुंद वळणांमुळे समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नसल्याने येथे छोटे-मोठे अपघात नित्याचेच झाले होते.
प्रशासकीय दिरंगाईमुळे चार वर्षे रखडलेल्या या कामासाठी मुहूर्त कधी मिळणार, असा संतप्त सवाल नागरिक विचारत होते. रस्ता रुंदीकरणाची ही मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. ‘सकाळ’मध्ये या संदर्भात सविस्तर वृत्त प्रसिद्ध होताच हालचालींना वेग आला. मंगळवारी या ठिकाणी प्रत्यक्ष रुंदीकरण प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली असून बुधवारी रस्त्यावर खडी टाकण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT