कोकण

‘स्वराज्य महोत्सव’साठी कसबा गाव सजले

CD

- rat१४p३.jpg-
P26O43344
संगमेश्वर ः तालुक्यातील कसबा गावात भिंतीवर काढलेली छत्रपती संभाजी महाराजांच्या आठवणी जपणारी चित्रे.
- rat१४p४.jpg-
26O43345
गल्लोगल्ली काढलेल्या किल्ल्यांच्या प्रतिकृती
---
स्वराज्य महोत्सवाची ऐतिहासिक रंगत
कसब्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीचा जल्लोष ; भित्तिचित्र, किल्ले स्पर्धांनी वेधले लक्ष
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १४ ः स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३६९ व्या जयंतीनिमित्त, महाराष्ट्र शासन आणि स्मारक समिती, कसबा-संगमेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘स्वराज्य महोत्सव २०२६’ ला सुरुवात झाली आहे. या महोत्सवामुळे सध्या संपूर्ण कसबानगरी ऐतिहासिक रंगात न्हाऊन निघाली आहे. हा महोत्सव उद्यापर्यंत (ता. १५) साजरा करण्यात येणार आहे.
महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरत आहे ती म्हणजे भव्य ‘मुद्रा भिंतीचित्र स्पर्धा’. महाराष्ट्राची वैभवशाली संस्कृती, कोकणचे निसर्गसौंदर्य आणि लोकजीवन या विषयांवर आधारित चित्रे कलाकारांनी कसब्यातील भिंतींवर साकारली आहेत. या भित्तिचित्रांमुळे गावातील गल्ल्यांना एखाद्या आर्ट गॅलरीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. छत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या ‘स्वराज्य किल्ले स्पर्धेत’ तरुणांनी आणि बालचमूंनी शिवकालीन गड-किल्ल्यांच्या हुबेहूब प्रतिकृती उभारल्या आहेत. तसेच, चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून चिमुकल्यांनी स्वराज्य आणि शिव-शंभूंचा इतिहास कागदावर उतरवला आहे. महोत्सवानिमित्त करण्यात आलेली विद्युत रोषणाई आणि भगव्या ध्वजांमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण आहे.
----
प्रेरणादायी सांस्कृतिक उत्सव
विविध स्पर्धांचे तांत्रिक आणि कलात्मक नियोजन ‘डी कॅड’ कॉलेजचे प्राचार्य रणजीत मराठे करीत आहेत. या सोहळ्यासाठी संपूर्ण कोकणातून शिवभक्त आणि पर्यटक मोठ्या संख्येने कसब्यात दाखल होत आहेत. भिंतीचित्रे आणि किल्ल्यांच्या प्रतिकृतींमुळे कसबा-संगमेश्वर परिसराला एका मोठ्या किल्ल्याचे स्वरूप आले आहे. हा महोत्सव संभाजी महाराजांच्या बलिदानाला आणि कर्तृत्वाला मानवंदना देणारा एक प्रेरणादायी सांस्कृतिक उत्सव ठरत आहे.
-------
कोट
छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाने पावन झालेल्या या भूमीत आयोजित हा महोत्सव तरुण पिढीला प्रेरणा देणारा ठरेल.
- राजेंद्र महाडिक, अध्यक्ष, स्मारक समिती, कसबा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Bomb Case: सीसीटीव्हीतील व्यक्ती स्वतःहून पोलिसांसमोर; पण निघाला MR, बॉम्ब प्रकरणाशी काहीही संबंध नाही!

Breaking : हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव पंजाब किंग्सच्या सामन्याला मुकणार; Mumbai Indians चं नेतृत्व कोण करणार?

Raj Thackeray: केंद्राचा एकछत्री कारभार विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर घाला... 'NEET' पेपरफुटीवर राज ठाकरेंचा संताप, सरकारवर जोरदार हल्ला

Yerwada Prison Escape : येरवडा खुल्या कारागृहातून जन्मठेपेचा कैदी फरार; आठवड्यातील दुसरी घटना, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

Cabinet Decisions: राखीव उमेदवारांचा खुल्या जागांवर दावा संपुष्टात ते पुणे नदी प्रकल्पासाठी जमिनी विनामूल्य हस्तांतरित होणार

SCROLL FOR NEXT