swt147.jpg
43367
नेरुर ः आमदार नीलेश राणे यांचा कलेश्वर मंदिर येथे ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. (छायाचित्र ः अजय सावंत)
समाजाभिमुख प्रकल्पांना प्राधान्य
नीलेश राणे ः नेरुर कलेश्वर मंदिरात जलशुध्दीकरण यंत्रणा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १४ ः जलशुद्धीकरण प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने मोठा फायदा होणार आहे. ग्रामीण भागात मूलभूत सुविधा सक्षम करण्यासाठी अशा विकासकामांची आवश्यकता असून भविष्यातही जनतेच्या हितासाठी विविध विकास प्रकल्प राबविण्यात येतील, असे प्रतिपादन आमदार नीलेश राणे यांनी नेरुर येथे केले.
तालुक्यातील नेरुर येथील ऐतिहासिक आणि पवित्र श्री कलेश्वर मंदिर परिसरात ग्रामस्थांच्या हिताचा महत्त्वपूर्ण असा जलशुद्धीकरण प्रकल्पाचे कुडाळ-मालवणचे आमदार राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. या प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांना स्वच्छ, शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असून ग्रामविकासाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. या लोकार्पण सोहळ्याला जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, काका कुडाळकर, पंचायत समिती सभापती मिलिंद नाईक, माजी सरपंच चारू देसाई, शिवसेना तालुका प्रमुख विनायक राणे, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, संदेश नाईक, नेरुर सरपंच भक्ती घाडी यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामस्थांनी देखील या उपक्रमाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले. धार्मिक आणि सामाजिक दृष्ट्या महत्त्व असलेल्या श्री कलेश्वर मंदिर परिसरात उभारण्यात आलेला हा प्रकल्प नागरिकांसाठी मोठी दिलासादायक बाब ठरणार आहे.