कोकण

पिंगुळी पाझर तलावासाठी उपाययोजना करा

CD

43460

पिंगुळी पाझर तलावासाठी उपाययोजना करा
आमदार नीलेश राणे : आरोग्यविषयक समस्या उद्‍भवू देऊ नका
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १४ : पिंगुळी गावातील पाझर तलावाची सुरक्षितता तसेच नळ योजनेला कोणत्याही प्रकारची आरोग्यविषयक समस्या उद्‌भवू नये, यासाठी आमदार नीलेश राणे यांनी संबंधित प्रकल्पधारक कंपनीला विविध उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. बैठकीत केलेल्या सूचनांची तातडीने पूर्तता करण्याची ग्वाही कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली. प्रकल्पामुळे गावातील नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली जाईल, असे सरपंच अजय आकेरकर यांनी सांगितले.
पिंगुळी पाझर तलावालगतच्या नियोजित बांधकाम प्रकल्पाबाबत जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर आणि काही ग्रामस्थांनी १ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. त्याला आमदार राणे यांनी भेट देत योग्य कार्यवाहीचे आश्वासन दिले होते. यानंतर २ मे रोजी त्यांनी पाझर तलाव परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून उपोषणकर्ते ग्रामस्थ, कंपनीचे प्रतिनिधी आणि ग्रामपंचायत प्रतिनिधींशी चर्चा केली. त्यानंतर एमआयडीसी विश्रामगृहात या विषयावर सविस्तर बैठक आयोजित केली होती. याला जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, सभापती मिलिंद नाईक, सरपंच अजय आकेरकर, सदस्य सागर रणसिंग तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. मात्र, उपोषणकर्त्यांपैकी कोणीही उपस्थित नव्हते. बैठकीत आमदार राणे यांनी गावकऱ्यांची बाजू ऐकून घेत पाझर तलावाच्या सुरक्षिततेसाठी आणि आरोग्यविषयक धोके टाळण्यासाठी विविध उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित कंपनीला दिल्या. त्यानुसार तलावाच्या तिन्ही बाजूंनी सिमेंट काँक्रिटची संरक्षक भिंत उभारणे, प्रकल्पातील सांडपाणी तलावात जाणार नाही यासाठी सुरक्षित अंतर ठेवून तीन मोठ्या क्षमतेचे पाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारणे, सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणे, तसेच कोणत्याही इमारतीचे सांडपाणी बाहेर पडू नये किंवा जमिनीत झिरपू नये यासाठी शास्त्रोक्त पद्धतीचे मोठे एसटीपी प्लान्ट उभारून त्यांची नियमित स्वच्छता करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
पाझर तलावाचा नैसर्गिकपणा टिकवण्यासाठी पर्यटन प्रकल्प राबविणे आणि तलावातील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी गाळ काढण्याचे अंदाजपत्रक तातडीने तयार करण्याच्या सूचनाही दिल्या. बैठकीत केलेल्या सर्व सूचनांची तातडीने अंमलबजावणी करण्यात येईल, अशी ग्वाही कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली. बैठकीला लघुपाटबंधारे विभागाचे अधिकारीही उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT