कोकण

अलोरेतील प्रवासी निवाऱ्यांची दूरवस्था

CD

अलोरेतील प्रवासी निवाऱ्यांची दुरवस्था
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २३ : अलोरे येथे बसस्थानक परिसरात प्रवाशांसाठी उभारण्यात आलेल्या निवाऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. निवाऱ्यांचे छप्पर कोसळले आहे. पावसामध्ये छत गळत असल्याने प्रवाशांना गळक्या छापराखाली उभे राहावे लागत आहे.
अलोरे येथील बस स्थानकावर वाहनांच्या प्रतीक्षेत उभे राहणाऱ्या नागरिकांची सोय व्हावी यासाठी जलसंपदा विभागाकडून काही वर्षांपूर्वी दोन्ही बाजूने मार्ग निवारे बांधण्यात आले. सध्या दोन्ही मार्ग निवाऱ्याची दुरवस्था झाली आहे. मार्ग निवाराच्या भिंतीवर फुकटात जाहिराती केल्या जातात. कोणी वाढदिवसाचे बॅनर लावतो तर कोणी आपल्या व्यवसायाची जाहिरात करतो. परंतु मार्ग निवारा हा प्रवाशांच्या सोयीसाठी आहे याची खबरदारी मात्र कोणीही घेत नाही. जे जाहिरातदार फुकटामध्ये जाहिरात करतात ते सुद्धा लोकसहभागातून मार्ग विभागाच्या दुरुस्तीसाठी अजून पुढे आलेले नाहीत. पावसाळा सुरू झाला तरी लोकप्रतिनिधीनी मार्गनिवाऱ्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले आहे.
पोफळी-चिपळूण मार्गावर अलोरे हे महत्त्वाचे स्थानक आहे. पोफळी आणि पश्चिम महाराष्ट्रात कुंभार्ली घाट मार्गे जाणारी सर्व वाहने येथे थांबतात. कोयना प्रकल्पाचे येथे कार्यालय असल्यामुळे या गावाला वेगळे महत्त्व आहे. जलसंपदा विभागात काम करणारे बहुतांशी कर्मचारी पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. मंदार एज्युकेशन सोसायटीमध्ये शिक्षणाच्या निमित्ताने आलेले अनेक विद्यार्थी आणि कर्मचारी अलोरेमध्ये राहतात. स्थानिक ग्रामस्थ, शाळेतील विद्यार्थी आणि कोयना प्रकल्पाचे कर्मचारी वाहनांच्या प्रतीक्षेत या मार्गनिवाऱ्यामध्ये उभे असतात. मार्ग निवाऱ्याचे पत्र्याचे छत फुटल्यामुळे निवाऱ्यात पाणी साचते, गळका पत्रा आणि दुर्गंधीयुक्त परिसरामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून या निवाऱ्यांची देखभाल करण्यात आलेली नाही. निवाऱ्यांचे पत्रे फुटले आहेत. लोखंडी खांबही गंजले असून, केव्हाही कोसळण्याची शक्यता आहे.
---
कोट
कोयना प्रकल्प कार्यालय, स्थानिक ग्रामपंचायत आणि एसटी महामंडळाने समन्वयातून रस्त्याच्या डाव्या-उजव्या बाजूस दोन पिकअप शेड उभे करण्याची गरज आहे. त्याला रंगरंगोटी, लाईट आणि पाण्याची सोय केली पाहिजे. जनसामान्यांना त्याचा नक्की उपयोग होईल.
-शशिकांत वहाळकर, सेवानिवृत्त प्राध्यापक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: बीकेसी मेट्रोच्या बेसमेंटमध्ये शिरला विषारी पाहुणा! दोन फूट लांबीचा रसेल्स वायपर सापडला, कर्मचाऱ्यांमध्ये घबराट

ICC T20 Ranking: अवघ्या वर्षभरात गाठलं शिखर! भारताची श्री चरणी बनली जगातील नंबर-१ टी-२० गोलंदाज; दीप्ती शर्माला मोठा फटका

PUC नियमांमध्ये मोठा बदल! नवीन वाहनधारकांना मिळणार खास सूट; पण जुनी गाडीधारकांच्या अडचणी वाढणार? जाणून घ्या RTOचा प्लॅन

Latest Marathi News Live Update : रायगडमध्ये दमदार पावसाची हजेरी

Forest Crackdown: सुधागडात खैर तस्करीवर वनविभागाचा धडाकेबाज छापा; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त, चार जण अटकेत

SCROLL FOR NEXT