कोकण

-कोयना ओसरली, इतिहास उलगडला

CD

- rat२३p१.jpg, rat२३p४.jpg-
P26O46071, P26O46074
चिपळूण ः कोयना कोरडी झाल्याने धरण क्षेत्रातील जुने अवशेष दिसू लागले आहेत.
----
कोयना ओसरली, इतिहास उलगडला
विस्थापनाच्या वेदना जाग्या ; जुन्या आठवणींना उजाळा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २३ : कोयना कोरडी झाली आणि धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील जुन्या गावाचा इतिहास, श्रद्धा, संस्कृती आणि विस्थापनाच्या वेदना आजही भग्न अवशेषांमधून बोलताना दिसत आहेत. कोयनेच्या खोऱ्यातील जुन्या आठवणींचा अभ्यास करण्यासाठी चिपळूणचे अभ्यासक समीर कोवळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह कोयनेची वारी केली. त्यानंतर ‘सकाळ’शी बोलताना त्यांनी कोयनेच्या खोऱ्यातील जुन्या गावाच्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या केल्या.
कोयना धरणाच्या उभारणीला १९५२ मध्ये सुरुवात झाली. या धरणाने या भागातील अनेक गावे, जमीन, मंदिरे, समाधी स्थळे आणि अनेकांच्या आठवणी पाण्याखाली नेल्या; मात्र या गावातील ग्रामस्थांची जिद्द संपवू शकली नाही. आज कोयनेचे पाणी ओसरल्याने पुन्हा एकदा या भागातील गावांचे जुन्या काळातील भग्न वैभव उघड्यावर आले आहे. जलदूत शहानवाज शहा यांनी माहिती देताना कोयनेच्या भागातील जुन्या घरांचे पाया, दगडी बांधकामांचे अवशेष, समाधी स्थळे, भग्न भिंती, मंदिरांचे खांब, नंदीची भग्न मूर्ती आणि पाण्याखाली लपलेला इतिहास पुन्हा उभा केला. गावकऱ्यांच्या आठवणींमध्ये आजही जिवंत असलेले बाजी कुसुंबेश्वर मंदिर, सोमजाई मंदिर, वेताळ मंदिर यासारखी अनेक प्राचीन मंदिरे नदीपात्रात पाहायला मिळत आहेत. ही मंदिरे पूर्ण स्वरूपात अस्तित्वात नसली तरी त्यांचे भग्नावशेष आणि दगडी खांब पाहताना तत्कालीन स्थापत्यकलेचे वैभव जाणवते. नदीपात्रात विखुरलेले दगडी अवशेष आणि भग्न नंदी मूर्ती या एकेकाळी समृद्ध असलेल्या धार्मिक व सांस्कृतिक वारशाची साक्ष देत असल्याचे श्री शहा यांनी सांगितले.
त्यानंतर गावकऱ्यांची भेट घेण्यात आली. त्यांच्या मते बाजी कुसुंबेश्वर मंदिर हे पांडवकालीन असून या मंदिराला विशेष धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. पूर्वी या मंदिर परिसरात १०५ गावांचा न्यायनिवाडा होत असल्याची दंतकथा आजही सांगितली जाते.
---
योग्य मोबदला नाहीच
कोयना धरण उभारण्यात आले, तेव्हा रुळे गावातील सुमारे दीडशेहून अधिक घरे पाण्याखाली गेल्याचे ज्येष्ठ नागरिक सांगतात. गावातील शेती, घरे, देवस्थाने, समाधी स्थळे आणि उपजीविकेची साधने धरणाच्या पाण्यात कायमची बुडाली. त्यानंतर गावकऱ्यांनी वरच्या बाजूस नवीन वस्ती करून पुन्हा संसार उभारला. मात्र गावाचे पुनर्वसन अपेक्षित पद्धतीने झाले नाही आणि अनेकांना योग्य मोबदला मिळाला नसल्याची खंत आजही व्यक्त केली जाते.
----
रुळे गावात २६० च्या आसपासच वस्ती
सध्या नव्या रुळे गावात अवघी २६० च्या आसपास लोकसंख्या वास्तव्यास आहे. त्यामध्येही बहुतांश वयोवृद्ध नागरिकांचा समावेश आहे. रोजगार, शिक्षण आणि इतर सुविधांच्या अभावामुळे युवक वर्ग गावाबाहेर आहे. तरीही गावाची एकी, परंपरा आणि सांस्कृतिक वारसा आजही कायम आहे. मुंबई, पुणे आणि इतर शहरांत वास्तव्यास असलेले गावकरी वर्षातून ठराविक वेळी गावात एकत्र येतात. गावातील उत्सव, यात्रा आणि धार्मिक परंपरा साजऱ्या करतात. आपल्या पूर्वजांच्या स्मृती जपण्याचा प्रयत्न करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: बीकेसी मेट्रोच्या बेसमेंटमध्ये शिरला विषारी पाहुणा! दोन फूट लांबीचा रसेल्स वायपर सापडला, कर्मचाऱ्यांमध्ये घबराट

PUC नियमांमध्ये मोठा बदल! नवीन वाहनधारकांना मिळणार खास सूट; पण जुनी गाडीधारकांच्या अडचणी वाढणार? जाणून घ्या RTOचा प्लॅन

Forest Crackdown: सुधागडात खैर तस्करीवर वनविभागाचा धडाकेबाज छापा; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त, चार जण अटकेत

Latest Marathi News Live Update : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आसूड मोर्चा

Ira Jadhav: मुंबईची 'रन-मशीन' आयरा जाधवची टीम इंडियात निवड; T20 आणि ODI दोन्ही संघात स्थान मिळवत वाढवला मुंबईचा मान!

SCROLL FOR NEXT