कोकण

... अन्यथा चिखलाचे पाणी नगरपरिषदेत

CD

46209

...अन्यथा चिखलाचे पाणी नगरपरिषदेत

देव्या सूर्याजींचा इशारा; गटारींच्या दुरवस्थेवरून प्रशासनावर संताप

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २३ ः पावसाच्या हलक्या सरीनंतरही मुख्य बाजारपेठेतील रस्त्यांवर पावसाचे पाणी तुंबत आहे. या गटारांची कामे नव्याने व प्रथम प्राधान्याने करावी, अशी मागणी करूनही त्या कामांना मंजुरी दिली गेली नाही. त्यामुळे संचयनी आरपीडी रोड परिसर, कंटक पाणंद, साई मंदिर तसेच चंदू भुवन येथील मुख्य रहदारीच्या ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचत आहे. नगरपरिषदेने तत्काळ उपाययोजना न केल्यास चिखलाचे पाणी मुख्याधिकाऱ्यांच्या केबीनमध्ये आणून ओतण्याचा इशारा नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी दिला आहे.
श्री. सूर्याजी म्हणाले, ‘नगरपरिषदेच्या पहिल्या स्थायी समिती सभेत गटारींचा मुद्दा मांडला होता.‌ मुख्य बाजारपेठेत ही गटारे असून, त्याकडे दुर्लक्ष केले गेले. यामुळे आज पावसाच्या हलक्या सरी पडल्यानंतरही रस्त्यावर पाणी साचते. बाजारपेठ असल्याने शालेय विद्यार्थी, महिला, नागरिकांना या चिखलातून वाट काढावी लागते. येथून जाणाऱ्या वाहनांमुळे हे पाणी लोकांच्या अंगावर उडते. याबाबत लक्ष वेधूनही कार्यवाही झालेली नाही. संचयनी आरपीडी रोड, कंटक पाणंद, साई मंदिर पंचम देवस्थान, चंदू भुवन आदी ठिकाणी अशीच परिस्थिती आहे.
---
मुख्याधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष!
मुख्याधिकारी याकडे दुर्लक्ष करत असून, फोन केल्यावर मिटिंगमध्ये असल्याचे सांगितले जाते. मेसेजदेखील बघितले जात नाहीत. त्यामुळे आज‌ लोकांना अंगावर चिखल उडवून घ्यावा लागतो आहे. दोन दिवसांत तात्पुरत्या स्वरुपात यावर कार्यवाही न झाल्यास हाच चिखल मुख्याधिकारी यांच्या कार्यालयात नेऊन ओतणार, असा इशारा नगरसेवक श्री. सूर्याजी यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lohagad Murder Case: हुडी घातलेला तरुण सीसीटीव्हीमध्ये दिसला अन् पोलिसांचा संशय बळावला; 'असा' लागला केतन अग्रवालच्या खुन्याचा शोध

Thane Illegal Schools: प्रवेशापूर्वी सावध व्हा! ठाणे जिल्ह्यातील बेकायदा शाळांची यादी जाहीर; पालकांना प्रशासनाचा इशारा

शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! महाराष्ट्रातील प्रत्येक गावात वेदर स्टेशन उभारणार, पीक नुकसानीचे अचूक मोजमाप होणार

Sickle Cell Test: लग्नाआधी करा 'ही' रक्त तपासणी; भविष्यात तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी ठरू शकते महत्त्वाची

Latest Marathi News Live Update : वाशिमच्या मानोरा-मंगरुळपीर तालुक्यात पावसाच्या सरी

SCROLL FOR NEXT