कोकण

जिल्हास्तरीय प्रशिक्षणात 96 शिक्षकांचा सहभाग

CD

rat१५p१.jpg-
26O51009
रत्नागिरी ः सहावीच्या शिक्षकांसाठी आयोजित प्रशिक्षणावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. केतन चौधरी. सोबत डायट प्राचार्य सुशील शिवलकर, वरिष्ठ अधिव्याख्याता दीपा सावंत, लवू आचरेकर, लठ्ठे, सुहास शेल्ये आदी.

शिक्षकांना नव्या अभ्यासक्रमाचे धडे
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १५ : राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अन्वये सहावीच्या पुनर्रचित मराठी माध्यम अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट)तर्फे जिल्हास्तरीय शिक्षक प्रशिक्षण झाले. यामध्ये ९६ जणांनी सहभाग घेतला होता. हे प्रशिक्षण शिरगाव येथील मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनमध्ये झाले.
मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांच्या या प्रशिक्षणाचे उद्‍घाटन झाले. या वेळी प्राचार्य डॉ. चौधरी यांनी मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनमधील विविध अभ्यासक्रमांची माहिती दिली. राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत कौशल्याधारित शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करतानाच नवीन अभ्यासक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शिक्षकांनी अध्यापनात नावीन्यपूर्ण आणि विद्यार्थीकेंद्रित पद्धतींचा अवलंब करावा, असे आवाहन त्यांनी केले.
रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे ९६ मराठी माध्यमाचे शिक्षक, शिक्षणाधिकारी व कर्मचारी या प्रशिक्षणात सहभागी झाले आहेत. या प्रसंगी डायट प्राचार्य सुशील शिवलकर, वरिष्ठ अधिव्याख्याता दीपा सावंत, अधिव्याख्याते लवू आचरेकर, लठ्ठे, तज्ज्ञ मार्गदर्शक सुहास शेल्ये, मोहन बापट, सुहास वाडेकर, संजना वारंग, नमिता वैद्य, प्रज्ञा खोब्रागडे तसेच कार्यक्रमाच्या समन्वयक श्वेता कवितके व देवयानी पवार उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP च्या 'जंतरमंतर'वरील आंदोलनाने वेधले लक्ष! रोहित शर्मा, सूर्या आणि बुमराहच्या पत्नींची प्रतिक्रिया चर्चेत

Sonam Wangchuk: 'या' अटी मान्य झाल्यास उपोषण सोडेन; रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचे सरकारला पत्र, तोडगा निघणार?

Anna Hazare : लोकशाहीत जनतेचा आवाज दडपून नव्हे, तर संवादातून प्रश्न सोडवावेत; अण्णा हजारे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

Delhi Police: 'ते' साध्या वेशातील लोक खरंच पोलिस होते का? दिल्ली पोलिसांनी कर्मचाऱ्यांसाठी काढले कडक आदेश

Mumbai Local : कसारा मार्गावरील गर्दीला अखेर दिलासा; सप्टेंबरपासून १५ डब्यांच्या लोकलचा होणार विस्तार

SCROLL FOR NEXT