

Cricketers' Wives React to Delhi Jantar Mantar Protest
Sakal
Rohit Sharma, Suryakumar Yadav, and Jasprit Bumrah's Wives React to Jantar Mantar Protest:
नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून दिल्लीमधील जंतर मंतर येथे कॉकरोच जनता पक्षाचे (CJP) आंदोलन सुरू आहे. बुधवारी (२२ जुलै) या आंदोलनाचा २५ वा दिवस होता. या आंदोलनाला गेल्या तीन-चार दिवसांपासून हिंसक वळण मिळाले आहे. त्यामुळे हे आंदोलन देशभर चर्चेत आहे. त्यावर आता भारतीय क्रिकेटपटूंच्या पत्नीही व्यक्त झाल्या आहेत.
या आंदोलनात तरुण विद्यार्थी सामील आहेत. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे. सातत्याने पेपरफुटीच्या घटना घडत असल्याने शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जबाबदारी घेत राजीनामा द्यावा या मागणीवर सीजेपी ठाम आहे.