कोकण

जांभेकर विद्यालयात जागृती

CD

-rat१५p१४.jpg-
26O51043
रत्नागिरी : बोलताना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, न्यायाधीश आर. आर. पाटील. सोबत दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) एच. आर. जाधव, मुख्याध्यापिका संजना तारी आदी.
---------
गोदुताई जांभेकर विद्यालयात
विधी सेवातर्फे जनजागृती कार्यक्रम
रत्नागिरी ः सौ. गोदुताई जांभेकर विद्यालय येथे विधी सेवा जनजागृती कार्यक्रमात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, न्यायाधीश आर. आर. पाटील आणि दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) एच. आर. जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार ठरवून दिलेल्या समान किमान कार्यक्रमांतर्गत बेटी बचाओ बेटी पढाओ, महिलांची सुरक्षितता, मुलांसाठी पोक्सो कायदा २०१२ आणि रस्तासुरक्षा या महत्त्वाच्या विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या प्रसंगी मुख्याध्यापिका संजना तारी, सर्व शिक्षक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, विधी स्वयंसेवक श्रीकांत जोशी प्रामुख्याने उपस्थित होते.
---
तालुकाध्यक्ष समीर काझी यांचा गौरव
सावर्डे ः राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेल चिपळूण तालुकाध्यक्ष समीर काझी यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा अल्पसंख्याक जिल्हा विभागातर्फे सत्कार करण्यात आला. काझी यांना महाराष्ट्र समाजसेवा रत्न पुरस्कार तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचा सत्कार चिपळूण तालुका पंचायत समिती सदस्य शौकत माखजनकर, जिल्हाध्यक्ष जाकीर शेकासन आदींच्या उपस्थितीत आमदार शेखर निकम यांच्या चिपळूण येथील संपर्क कार्यालयात करण्यात आला.


विद्याभारती गुरूकुलमध्ये व्यक्तीपरिचय उपक्रम
चिपळूण ः विद्याभारती भारतीय शिक्षा संकुल शिरळ गुरूकुल येथे नुकतेच व्यक्तीपरिचय उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमासाठी मिलिंद तांबे उपस्थित होते. तांबे यांनी विद्यार्थ्यांना वकिली व्यवसायाबद्दल सविस्तर माहिती दिली. वकिली करताना आपले क्षेत्र सांभाळत असताना सामाजिक कार्य करणेही गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games MMA : अवघ्या ७०० ग्रॅमने सुवर्णपदकाची संधी हुकली!; अाशियाई क्रीडा स्पर्धा ; सुचिका तारियालला मिक्स्ड मार्शल आर्ट्‌समध्ये ब्राँझपदक

फुलांची आरास अन् गणपतीचं गोंडस रूप! पुण्यात या ठिकाणी आहे नाना पाटेकरांचा गणपती; राहुल देशपांडेंनी शेअर केला फोटो

Marathi News Live Updates : ‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

Radhanagari Dam Gate Opens : राधानगरी धरणाचा क्रमांक तीनचा स्वयंचलित दरवाजा उघडला; धरणातून 2628 क्युसेक विसर्ग, घाटमाथ्यावर दमदार पाऊस

Kolhapur Gokul Election 2026 : आमदार, माजी आमदारांसह बडे नेते 'गोकुळ'च्या रिंगणात; एकाच दिवशी 133 इच्छुकांचे 205 उमेदवारी अर्ज दाखल, आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT