कोकण

पावस - गोळप येथे एस. एम. जोशी यांचे भव्य स्मारक उभारणार

CD

- rat५p७.jpg-
26O55381
गोळप येथे एस. एम. जोशी यांचे स्मारक उभारण्याच्यादृष्टीने पाहणी करताना अभिजित हेगशेट्ये, पंचायत समिती सदस्य नेताजी पाटील, वारिशे आणि डॉ. सदानंद आग्रे आदी.
----
एस. एम. जोशी स्मारकाला गती
गोळपमध्ये लवकरच उभारणी ; पालकमंत्री उभारणी, युवापिढीला प्रेरणादायी
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. ५ : मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारे संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे शिल्पकार, ज्येष्ठ समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक स्व. एस. एम. जोशी (अण्णा) यांचे मूळ गाव तालुक्यातील गोळप हे आहे. गोळप येथे एस. एम. अण्णांच्या लढवय्या आणि जाज्वल्य इतिहासाची प्रेरणा युवापिढीसमोर उभी राहावी, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून स्मारक उभारण्याची मागणी होत होती. आता या संकल्पनेला प्रत्यक्ष वास्तवात आणण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
गोळप येथील एस. एम. अण्णांच्या मूळ राहत्या घराच्या ठिकाणी शासनातर्फे अत्यंत आकर्षक आणि प्रेरणादायी स्मारक उभारण्याचा मनोदय पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनीही व्यक्त केला आहे. एस. एम. जोशी हे राष्ट्रसेवा दलाच्या स्थापनेचे शिल्पकार, पुरोगामी व समाजवादी चळवळीचे धुरंधर सेनानी, तसेच नवनिर्माण आंदोलनात लोकनायक जयप्रकाश नारायण यांचे खंदे सहकारी होते. त्यांचे आदर्श राजकीय नेतृत्व ही आजही तरुणांसाठी प्रेरणा आहे. त्यामुळे त्यांच्या मूळ गावी हे स्मारक उभारले जाणे ही लाखो एस. एम. प्रेमी, पुरोगामी आणि विवेकवादी चळवळीतील कार्यकर्त्यांसाठी अत्यंत आनंदाची बाब ठरणार आहे, असे हेगशेट्ये यांनी सांगितले.
---
मूळ वास्तूची पाहणी
स्मारक समितीच्या सदस्यांनी, पंचायत समिती सदस्य नेताजी पाटील, वारिशे आणि डॉ. सदानंद आग्रे यांनी गोळप येथील एस. एम. जोशी यांच्या मूळ घराच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी केली. सध्या या ठिकाणी कोणीही राहत नसून मूळ घराची वास्तू बहुतांश कोसळलेल्या अवस्थेत आहे. या जागेवर लवकरच एक भव्य आणि प्रेरणादायी स्मारक साकारले जाईल. हे स्मारक महाराष्ट्रातील आणि देशातील युवकांना वैचारिक मुल्यांची, संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या इतिहासाची तसेच कोकणच्या पुरोगामी वारशाची ओळख करून देणारे प्रमुख केंद्र ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुरुंगातून सुटल्यानंतर संतोष पंडित यांचा पहिला व्हिडीओ, रस्त्यात खड्ड्याला घातला हार; पाहा video

IND vs JPN: ३२ धावा करूनही भारताने जपानला हरवलं! २ धावांच्या थरारक विजयासह टीम इंडियाने रचला असा वर्ल्ड रेकॉर्ड, जो आजपर्यंत कुणालाच जमला नाही

PPF की NPS? दरमहा 5000 रुपयांच्या गुंतवणुकीतून उभे राहतील दीड कोटी रुपये; जाणून घ्या संपूर्ण गणित

Marathi News Live Updates: पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस

साहील मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! परीक्षेदरम्यान प्राध्यापकांनी बाजूला नेलं अन्..., CCTV फुटेज समोर, 15 मिनिटांत काय घडलं?

SCROLL FOR NEXT