कोकण

कथाकथन स्पर्धा

CD

rat५p२.jpg-
26O55376
रत्नागिरी : देव, घैसास, कीर महाविद्यालयात आयोजित कथाकथन कार्यशाळेत बोलताना प्रा. साक्षी चाळके.
---
‘डीजीके’मध्ये कथाकथन कार्यशाळा
रत्नागिरी : देव, घैसास, कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी येथे वाङ्मय विभाग, सांस्कृतिक विभाग, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने कथाकथन : एक गोष्ट सांगण्याची कला या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा झाली. कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवातील सुवर्णपदक विजेत्या व गोगटे-जोगळेकर महाविद्यालयच्या प्रा. साक्षी चाळके यांनी कथाकथनाची कला, प्रभावी सादरीकरण, आवाजातील चढ-उतार, देहबोली आणि भाव या विषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या मधुरा पाटील, वाङ्मय विभागप्रमुख व उपप्राचार्या प्रा. वसुंधरा जाधव, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. ऋतुजा भोवड, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. विनय बावदाने, हिंदी विभागप्रमुख प्रा. प्रियांका कुंभार आणि मराठी विभागप्रमुख प्रा. गौरी हळदवळेकर उपस्थित होते.

....तरच सागरी परिसंस्था
वाचतील ः भावे

रत्नागिरी : कातळसडे वाचले तरच सागरी परिसंस्था वाचतील, असे प्रतिपादन सृष्टी कॉन्झर्वेशन फाउंडेशनचे सागरी संवर्धन या क्षेत्रातील सहाय्यक संचालक, संशोधक डॉ. विशाल भावे यांनी केले. अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात पर्यावरण जाणीवजागृती मंडळाच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी उपप्राचार्य सुनील गोसावी, पर्यवेक्षक विद्याधर केळकर, ज्येष्ठ शिक्षक डी. आर. वालावलकर, मंडळाच्या समन्वयक स्मिता पाथरे आणि ऋषिराज नागवेकर आदी उपस्थित होते.


फाटक हायस्कूलमध्ये
पद्मश्री आठल्येंचा सत्कार
रत्नागिरी : फाटक हायस्कूलमधील ज्येष्ठ शिक्षिका पद्मश्री आठल्ये यांचा दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा दाक्षायणी बोपर्डीकर यांनी सन्मान केला. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ॲड. बाबासाहेब परूळेकर, ॲड. विनय आंबुलकर, मुख्याध्यापक राजन कीर, उपमुख्याध्यापक विश्वेश जोशी, सचिव राजीव गोगटे, परशुरामपंत अभ्यंकर विद्यामंदिरचे मुख्याध्यापक विनोद नारकर आदी उपस्थित होते. पद्मश्री आठल्ये यांनी २६ वर्षे अध्यापनाचे कार्य केले. या वेळी त्यांनी संस्थेला रोख स्वरूपात देणगी रक्कम देऊन संस्थेचे ऋण व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना बालपण, शिक्षण आणि सेवेतील आठवणींना उजाळा देत शाळेची विद्यार्थिनी, शिक्षिका, संस्था संचालक अशा विविध भूमिकांमधून शाळा आणि संस्थेच्या हितासाठी केलेल्या कामांबद्दल समाधान व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MCOCA: पुण्यात विषारी दारूमुळे २१ जणांचा बळी घेणाऱ्या टोळीवर ‘मकोका’; राज्य गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

Daund News : बनावट कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणात दौंडचे नगरसेवक रोहित पाटील यांचे सदस्यत्व रद्द

Food Safety Crackdown: कऱ्हाडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; दोन हॉटेल सील, तीन हॉटेलांवर दंडात्मक हालचाली

Latest Marathi News Live Update : श्रेया कालरा हिने नेटफ्लिक्सचा 'कॅप्टिव्ह' रिअ‍ॅलिटी शो जिंकला

ती सगळ्यांसमोर पाणउतारा करायची... अशोक शिंदेनी सांगितलं सेटवर कशा वागायच्या अलका कुबल; पहाटे साडे पाचला...

SCROLL FOR NEXT