कोकण

''सामाजिक बांधिलकी''ला रुग्णोपयोगी साहित्य भेट

CD

swt52.jpg
55397
सावंतवाडी ः रेडकर कुटुंबियांतर्फे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला साहित्य भेट देण्यात आले.

‘सामाजिक बांधिलकी’ला
रुग्णोपयोगी साहित्य भेट
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ५ ः येथील सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रुग्णसेवा आणि सामाजिक कार्याची दखल घेत रेडकर कुटुंबीयांनी संस्थेला रुग्णोपयोगी साहित्य भेट दिले. ​शहरातील प्रतिष्ठित नागरिक चित्तरंजन नाईक-रेडकर आणि देवेंद्र नाईक-रेडकर यांनी आई (कै.) प्रतिभा प्रमोद नाईक-रेडकर यांच्या स्मरणार्थ हे साहित्य दान केले. यामध्ये प्रामुख्याने फाउलर बेड व त्यावर घालण्यासाठी गादी, व्हीलचेअर, कमोड चेअर आणि वॉकर अशा अत्यावश्यक वस्तूंचा समावेश आहे.
यापूर्वीही अनेक दानशूर व्यक्तींनी संस्थेला नवीन रुग्णवाहिका आणि इतर वैद्यकीय साहित्य दिले आहे. ​रेडकर कुटुंबीयांच्या या दातृत्वाबद्दल सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे यांनी आभार मानले. ​याप्रसंगी प्रतिष्ठानचे सदस्य रुपा मुद्राळे, लक्ष्मण कदम आणि रवी जाधव उपस्थित होते. रेडकर कुटुंबीयांच्या या सामाजिक उपक्रमाचे शहरातून विशेष कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Release : कोयना धरणातून 3983 क्युसेक विसर्ग; कृष्णा नदीची पातळी वाढणार, आज सायंकाळपर्यंत पाणी पोहोचणार सांगलीत

Gangs Of Wasseypur: वासेपूर पुन्हा गोळीबाराने हादरले; फहीम खानच्या भावावर दिवसाढवळ्या हल्ला, गँगवॉर पुन्हा भडकणार?

Xiaomi 18 Pro Series होणार लाँच! 8500mAh बॅटरी, ड्युअल 200MP Leica कॅमेरा; पाहा नव्या फ्लॅगशिपचे भन्नाट फीचर्स!

Marathi News Live Updates : छात्रों की गूंज' हा पुढील कार्यक्रम चेन्नईमध्ये

Mumbai Water Metro: मुंबई वॉटर मेट्रोसाठी समुद्रतळाचा मोठा अडथळा; खडकाळ भागात ‘रॉक ड्रेजिंग’, २५० किमी जलमार्गांचा विकास

SCROLL FOR NEXT