कोकण

निरोगी जीवनासाठी व्यायाम आवश्यक

CD

55484

निरोगी जीवनासाठी व्यायाम आवश्यक

डॉ. अनंत डवंगे ः सिंधुदुर्गनगरीत चिकित्सा, रक्तदान शिबिर

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ५ ः निरोगी राहण्यासाठी आदर्श जीवनशैली अंगीकृत करून नियमित व्यायाम आणि सकस आहार घेणे गरजेचे असल्याचे मत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अनंत डवंगे यांनी विशेष रक्तदान जनजागृती व आरोग्य शिबिरात मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री (कै.) अजित पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ व जयंतीनिमित्ताने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या वतीने जिल्ह्यात विशेष रक्तदान जनजागृती, आरोग्य तपासणी व आरोग्य शिबिर अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत श्री पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ फार्मसी व कॉलेज ऑफ नर्सिंग, वाडी हुमरमळा येथे भव्य जनजागृती कार्यक्रम झाला.
या कार्यक्रमास अधिष्ठाता डॉ. डवंगे, इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भुपतसेन सावंत, कॅम्पस डायरेक्टर ऋतुजा परब, प्राचार्य डॉ. युवराज पांढरे, डॉ. रामचंद्र नागरगोजे, डॉ. सरिता ठाणेकर, डॉ. प्रियेश पाटील, डॉ. सौरभ पाटील, डॉ. धनंजय भोसले, डॉ. मोनालिसा वजराटकर, डॉ. गौरव घुर्ये, डॉ. वृषाली माळी, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-----
सकस आहार गरजेचा!
यावेळी डॉ. डवंगे यांनी निरोगी राहण्याकरिता आदर्श जीवनशैली सर्वांनी अंगिकृत करून, नियमित व्यायाम व सकस आहार घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच रक्तदानाचे मानवी जीवनातील महत्त्व, आरोग्य तपासणीचे फायदे आणि आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MCOCA: पुण्यात विषारी दारूमुळे २१ जणांचा बळी घेणाऱ्या टोळीवर ‘मकोका’; राज्य गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

Daund News : बनावट कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणात दौंडचे नगरसेवक रोहित पाटील यांचे सदस्यत्व रद्द

Food Safety Crackdown: कऱ्हाडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; दोन हॉटेल सील, तीन हॉटेलांवर दंडात्मक हालचाली

Latest Marathi News Live Update : श्रेया कालरा हिने नेटफ्लिक्सचा 'कॅप्टिव्ह' रिअ‍ॅलिटी शो जिंकला

ती सगळ्यांसमोर पाणउतारा करायची... अशोक शिंदेनी सांगितलं सेटवर कशा वागायच्या अलका कुबल; पहाटे साडे पाचला...

SCROLL FOR NEXT