कोकण

समर्थ रंगभूमी तर्फे शालेय साहित्य वाटप

CD

rat ६p५.jpg-
P26O55611
रत्नागिरी ः मराठी शाळा बाजे कुंभ नेवरे येथे शालेय साहित्याचे वाटप करताना समर्थ रंगभूमीचे पदाधिकारी आणि शिक्षकवृंद.
----
समर्थ रंगभूमीतर्फे शालेय साहित्य वाटप
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ ः येथील समर्थ रंगभूमीतर्फे सलग २३व्या वर्षी रत्नागिरी तालुक्यातील मराठी शाळा नेवरे नं. १ आणि मराठी शाळा बाजे कुंभ नेवरे या दोन शाळांतील विद्यार्थ्यांना वह्या, कंपास पेट्या, रंगपेट्या, चित्रकला वह्या आदींचे वाटप करण्यात आले.
समर्थ रंगभूमीतर्फे गेल्या २३ वर्षांत ४७ शाळेतील हजारो विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवण्यात आले आहे. होतकरू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून अधिक उत्साहाने काम करण्याची ऊर्जा आम्हा सर्वांनाच मिळते, असे संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी सांगितले. संतोष बोरकर यांनी बालपणीचे किस्से सांगून मुलांना प्रोत्साहित केले. सुशील जाधव यांनी संस्थेच्या वाटचालीचा मागोवा घेतला. या वेळी किरण रेवाळे आणि नितीन सावंत या दोन्ही शाळेच्या मुख्याध्यापकांनी संस्थेचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी अनुराधा पोतदार, मैत्री लांजेकर या शिक्षिका तसेच समृद्धी गुरव, दिव्या गुरव आदी उपस्थित होते. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मिलिंद सावंत, श्रीकांत पाटील, सुहास साळवी, चंद्रमोहन देसाई, जय शिंदे, संतोष बोरकर, अशोकराव सावंत, गजानन गाठे, ओंकार पाटील यांचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra MLC Election 2026 : पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी मतदानाची तारीख ठरली; आजपासून आचारसंहिता लागू

Meesho Share Price: दसरा-दिवाळीआधी Meesho चा शेअर सुसाट! 110% रिटर्न; बिझनेस मॉडेलची जोरदार चर्चा

'तोंड पुसायला बायकोची ओढणी नाही का?’ गौरी खानची सोडून शाहरुखने मॅनेजरच्या ओढणीने पुसला चेहरा, Viral Video पाहून नेटकरी म्हणाले...

विसर्जनाला 'अशा' हटके पद्धतीने बनवा उकडीचे मोदक! काय आहे काकूंच्या मोदकांची खासियत? Ukadiche Modak Recipe

Marathi News Live Updates : ध्वनी प्रदुषणाच्या मुद्द्यावरुन हायकोर्टाने सरकारला सुनावलं!

SCROLL FOR NEXT