कोकण

वाकवली येथे कृषी विज्ञान पदव्युत्तर संस्था

CD

- rat६p६.jpg-
26O55612
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी चर्चा करताना गृहराज्यमंत्री योगेश कदम.
---
वाकवलीला ‘पदव्युत्तर कृषी संस्था’
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे ः तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश, मंत्रालयात बैठक
सकाळ वृत्तेसवा
दापोली, ता. ६ ः कोकणातील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर कृषी शिक्षण आणि अत्याधुनिक संशोधनाच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत जिल्ह्यातील वाकवली येथे नवीन शासकीय कृषी विज्ञान पदव्युत्तर संस्था उभारणे आवश्यक आहे. या संस्थेमुळे कृषी संशोधन, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि स्थानिक रोजगाराला मोठा दिलासा मिळेल. त्यामुळे याबाबतचा सविस्तर प्रस्ताव तातडीने तयार करून शासनाकडे सादर करावा, असे निर्देश कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.
वाकवली येथे नवीन पदव्युत्तर संस्था स्थापन करण्याबाबत कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस राज्यमंत्री योगेश कदम, दापोली कृषी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. संजय भावे, कृषी विभागाच्या उपसचिव प्रतिभा पाटील यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या वेळी भरणे म्हणाले, वाकवली येथील मध्यवर्ती संशोधन केंद्रामध्ये पदव्युत्तर कृषी शिक्षण व संशोधनासाठी आवश्यक असलेले विस्तीर्ण क्षेत्र, सुसज्ज प्रयोगशाळा, पायाभूत सुविधा आणि लागवडीयोग्य जमीन उपलब्ध आहे. त्यामुळे या ठिकाणी पदव्युत्तर संस्था स्थापन करण्यासाठी अत्यंत अनुकूल वातावरण आहे. या संस्थेमुळे कृषी संशोधनाला चालना मिळण्याबरोबरच कोकणातील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाची मोठी संधी उपलब्ध होऊन स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मितीला गती मिळेल.
---
कृषी संस्था हा ऐतिहासिक प्रकल्प
‘रत्नागिरी आणि संपूर्ण कोकणासाठी वाकवली येथील पदव्युत्तर कृषी विज्ञान संस्था हा एक ऐतिहासिक प्रकल्प ठरेल. यामुळे कोकणातील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी इतरत्र जावे लागणार नाही. संशोधन, कौशल्य विकास आणि स्थानिक कृषिक्षेत्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ही संस्था मैलाचा दगड ठरेल,’ असा विश्वास राज्यमंत्री कदम यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लालबागच्या राजाच्या चरणी केलेलं दान कुणाच्या खिशात जातंय? अभिनेत्रीने ठेवलेली ५०० ची नोट गायब होताच, नेटकऱ्यांचा सवाल

INDW vs SLW Final : 'गोल्डन गर्ल्स'! भारतीय संघाने इतिहास रचला, श्रीलंकेला नमवून जिंकले दुसरे सुवर्णपदक; स्मृती, शफाली, रिचा चमकल्या

Hupari Rendal Police News : पत्नीच्या निधनाच्या नैराश्यातून रेंदाळमध्ये वृद्धाची आत्महत्या

IND vs JPN, T20I: जपानने भारतीय संघाचा धूर काढला! श्रेयसचा संघ अवघ्या २ धावांनी जिंकला, फलंदाज गंडले, गोलंदाजही रडले

Marathi News Live Updates : राज्यात बहुंताश ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT