कोकण

जिल्ह्यात जलमित्र नियुक्ती रखडली

CD

55695

जिल्ह्यात जलमित्र नियुक्ती रखडली
जलजीवन मिशन : योजनांच्या देखभाल दुरुस्तीचा प्रश्न जटिल
नंदकुमार आयरे : सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ६ : जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांची देखभाल-दुरुस्ती व्हावी, यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये नेमण्यात येणाऱ्या नल जलमित्र नियुक्तीची प्रक्रिया अद्यापही रखडली आहे. या पदांसाठी जिल्ह्यातून ३,५०७ उमेदवारांची नामनिर्देशन प्राप्त झाली असली, तरी या प्रक्रियेला अद्याप गती मिळत नसल्याने जिल्ह्यातील नळपाणी योजनेच्या देखभाल-दुरुस्तीचा प्रश्न कायम आहे.
जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना कार्यान्वित घरगुती नळ जोडणीद्वारे नियमित प्रतिदिन प्रतिमाणशी ५५ लिटर पाणी उपलब्ध करून देण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांची देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी व योजना शाश्वत टिकवण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध असणे आवश्यक आहे. यासाठी लोकसहभागाला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आले आहे.
पाणीपुरवठा योजना पूर्व-नियोजन टप्प्यापासून ते देखभाल व दुरुस्ती टप्प्यापर्यंत योजनेच्या भागधारकांचा सक्रिय सहभाग असल्याशिवाय योजना टिकू शकत नाही. या सर्व बाबींचा विचार करून जलजीवन मिशनअंतर्गत राज्यातील पाणीपुरवठा योजनांची देखभाल व दुरुस्ती योग्य रीतीने व्हावी, या उद्देशाने प्रति ग्रामपंचायत तीन अनुभवी ‘‘नल जलमित्र’’ निवडण्याचा निर्णय शासनाने घेतला गेला.
याकरिता जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये गवंडी, मेकॅनिकल फिटर, इलेक्ट्रिशियन/पंप ऑपरेटर याप्रमाणे प्रत्येक ट्रेडसाठी तीन याप्रमाणे प्रति ग्रामपंचायत ९ उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे, संबंधित व्यक्तीचे आधार कार्ड व फोटो मागविले होते. जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींसाठी एकूण १,२९३ नल जलमित्र नेमणूक होणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीकडून तीन पदांसाठी नऊ अशी एकूण ३,८७९ नामनिर्देशन पत्रे येणे अपेक्षित होते, मात्र जिल्ह्यातून ३,५०७ एवढी नामनिर्देशन पत्रे जिल्हास्तरावर प्राप्त झाली आहेत. तरीही या नियुक्ती प्रक्रियेला अद्याप गती आलेली नाही.
प्राप्त झालेल्या अर्जांनुसार संबंधित उमेदवारांची २० गुणांची ऑनलाईन चाचणी घेऊन त्यातून आवश्यक ते उमेदवार निवडले जाणार आहेत. मात्र, या प्रक्रियेला संबंधित उमेदवारांकडून आवश्यक प्रतिसाद मिळत नसल्याने ही प्रक्रिया लांबली असल्याचे पाणी व स्वच्छता मिशन विभागाचे म्हणणे आहे. यामुळे जिल्ह्यातील शेकडो नळपाणी योजनांची देखभाल-दुरुस्ती कोण करणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

चौकट
नियुक्तीची प्रतीक्षा

प्राप्त नामनिर्देशने
गवंडी: १,२३९
मेकॅनिकल फिटर: १,१२८
इलेक्ट्रिशियन / पंप ऑपरेटर: १,१४०

कोट
‘‘शासन निर्देशानुसार नल जलमित्र नेमणुकीची प्रक्रिया सुरू असून, प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ''नल जलमित्र'' नेमणुकीसाठी ग्रामपंचायतीमार्फत विहित नमुन्यात सादर केलेल्या शिफारस पत्रातील ९ नामनिर्देशित व्यक्तींमधून राज्यस्तरावर प्री-स्क्रीनिंग करून ट्रेडनुसार ३ नामनिर्देशने अंतिम होणार आहेत. त्यानंतर संबंधित उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात येईल. उमेदवारांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतरच त्यांची नियुक्ती केली जाईल.’’
- अजिंक्य सावंत, प्रकल्प संचालक, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, सिंधुदुर्ग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT