कोकण

साखरीनाटेसाठी आपत्कालीन वीजवाहिनीची मागणी

CD

साखरीनाटेच्या वीजप्रश्नाला पर्याय द्या
ग्रामपंचायतीचे निवेदन ; वारंवार पुरवठा खंडित
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ७ ः महावितरणच्या सततच्या वीजपुरवठ्यातील व्यत्ययामुळे साखरीनाटे गावातील नागरीक, व्यापारी व मच्छी व्यावसायिकांना मोठ्या आर्थिक व मानसिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे जैतापूर ब्रिजमार्गे येणाऱ्या ११ केव्ही आपत्कालीन वीजवाहिनीचा पुरवठा साखरीनाटे गावाला जोडून देण्यात यावा, अशी मागणी साखरीनाटे ग्रामपंचायतीने महावितरणकडे निवेदनाद्वारे केली आहे.
साखरीनाटे हे रत्नागिरी जिल्ह्यातील महत्त्वाचे मच्छीमारी बंदर असून, गावाची लोकसंख्या सुमारे साडेचार हजार आहे. ऐतिहासिक यशवंतगड किल्ला, मोठी बाजारपेठ आणि विविध व्यावसायिक उपक्रमांमुळे गावाला आर्थिकदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. येथे कोल्डस्टोरेज, आईस फॅक्टरी, मच्छीपूरक उद्योग, वेल्डिंग, फॅब्रिकेशन, जाळीकाम, इतर लघुउद्योग मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत; मात्र, वारंवार होणारे लोडशेडिंग, शॉर्टसर्किट, वीजवाहिन्या व खांब पडणे, पावसाळ्यात वीज कोसळल्याने होणारे नुकसान यामुळे गावाचा वीजपुरवठा अनेकदा खंडित होतो. काहीवेळा आठवडाभर वीज नसल्याने जनजीवन विस्कळीत होते. लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याचे ग्रामपंचायतीने निवेदनात नमूद केले आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेवरही परिणाम होत असून, पाणीवितरणाचे वेळापत्रक कोलमडते. त्यामुळे ग्रामपंचायतीला ग्रामस्थांच्या नाराजीचा सामना करावा लागत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. या सर्व बाबींचा विचार करून साखरीनाटेपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या जैतापूर ब्रिज येथील ११ केव्ही आपत्कालीन वीजवाहिनी साखरीनाटे गावाशी जोडण्यात यावी. या पर्यायी वीजपुरवठा व्यवस्थेमुळे नैसर्गिक आपत्ती अथवा तांत्रिक बिघाडाच्या काळातही गावाचा वीजपुरवठा सुरळीत राहून नागरिक व व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळेल, असे या निवेदनाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Rules: EMI भरला नाही तर मोबाइल लॉक होणार? RBI चा नवा नियम काय सांगतो? पाहा

Ajinkya Rahane New Journey: निवृत्तीनंतर अजिंक्य रहाणेचा मोठा निर्णय! म्हणाला, क्रिकेटने मला भरपूर काही दिलं, आता...

Missing Link Accident: पुण्याहून मुंबईकडे निघाले, मिसिंग लिंकवर येताच होत्याचं नव्हत झालं; पुण्यातील युवा काँग्रेस नेत्याचा मृत्यू, मध्यरात्री काय घडलं?

Marathi News Live Updates : शेतकरी कर्जमाफीचा पहिला हफ्ता वितरीत

Health Tips: सतत ब्लड टेस्ट करताय? अनावश्यक रक्त चाचण्यांमुळे वाढतोय ॲनिमिया आणि मानसिक तणाव!

SCROLL FOR NEXT