निवडणूक वाहनभाडे सहा महिने थकीत
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. ६ ः जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी वाहने उपलब्ध करून देणाऱ्या दापोलीतील वाहन चालक-मालकांना सहा महिने उलटूनही भाडे मिळालेले नाही. वारंवार पाठपुरावा करूनही देयक न मिळाल्याने चालक-मालकांनी तहसीलदारांकडे निवेदन देत तातडीने रक्कम अदा करण्याची मागणी केली आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी ५ ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत दापोली तालुक्यातील अनेक वाहनचालक-मालकांनी प्रशासनाला वाहने उपलब्ध करून दिली होती; मात्र, निवडणूक होऊन सहा महिने उलटूनही वाहनभाडे मिळाले नसल्याने चालक-मालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. निवडणुकीदरम्यान इंधन, वाहनांची देखभाल आणि इतर खर्च भागवण्यासाठी अनेकांना कर्ज अथवा उसनवारी करावी लागली होती. वेळेत देयक मिळेल, या अपेक्षेवर त्यांनी खर्च केला; मात्र भाड्याची रक्कम अद्याप न मिळाल्याने कर्जाचा बोजा वाढला असून, कुटुंबाचा उदरनिर्वाहही कठीण झाल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून संबंधित कार्यालयांकडे पाठपुरावा करूनही केवळ आश्वासने मिळत असल्याचा आरोप चालक-मालकांनी केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.