कोकण

''टाकाऊतून टिकाऊ'' स्पर्धेचे आयोजन

CD

''टाकाऊतून टिकाऊ'' स्पर्धेचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ६ ः प्लास्टिकमुक्त सिंधुदुर्ग घडविण्याच्या उद्देशाने मिशन आधार, सिंधुदुर्गच्या वतीने जिल्हास्तरीय ''टाकाऊतून टिकाऊ'' कापडी पिशवी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रथम क्रमांकासाठी ५,००१ रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय ३,००१ रुपये व सन्मानचिन्ह, तृतीय २,००१ रुपये व सन्मानचिन्ह तसेच पाच उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी १,००१ रुपये अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. पिशवी पूर्णपणे टाकाऊ वस्तूंमधून तयार केलेली असावी. पिशवी मजबूत व वापरण्यायोग्य असणे आवश्यक असून, ती स्वतः तयार केल्याचा कटिंगपासून पूर्ण तयार होईपर्यंतचा लघू व्हिडिओ स्पर्धकांकडे असणे बंधनकारक आहे. स्पर्धेसाठी तयार केलेली पिशवी व स्पर्धकाची माहिती २५ ऑगस्टपर्यंत कुडाळ, मालवण किंवा सावंतवाडी येथील मिशन आधारच्या निर्धारित केंद्रांवर जमा करावी लागणार आहे. स्पर्धेसाठी जमा केलेल्या पिशव्या संस्थेकडे कायमस्वरुपी राहतील. बक्षीस वितरण लवकरच करण्यात येणार असून, त्याबाबतची माहिती स्पर्धकांना दूरध्वनीद्वारे दिली जाईल. अधिक माहितीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन मिशन आधार, सिंधुदुर्गच्या वतीने करण्यात आले आहे.
..................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil Protest : मनोज जरांगे पाटील पुन्हा अडचणीत? आंदोलनाशी संबंधित आर्थिक व्यवहार आयकर विभागाच्या रडारवर

Kagal-Peth Naka Traffic News : कागल-पेठ नाका महामार्गाचे सहापदरीकरण रखडले; MIDC, वाहनधारकांची मोठी गैरसोय, लक्ष्मी टेकडीसह कणेरीवाडीतील रस्ते अपूर्ण

Asian Games: Smriti Mandhana ने नवा वर्ल्ड रेकॉर्ड करत घडवला इतिहास! धवनलाही मागे टाकत विराट-धोनीच्या पंक्तीत मिळवलं स्थान

Marathi News Live Updates : हिंगोलीत पंधरा दिवसात पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कोरड्या दुष्काळाची दाहकता वाढली

Gokul Election 2026 : गोकुळ निवडणुकीत महायुतीचा फॉर्म्युला ठरला! जागावाटपावर मंत्री हसन मुश्रीफांचे मोठे भाष्य; म्हणाले, 'आता अदृश्य शक्ती लुप्त झालीय...'

SCROLL FOR NEXT