- rat७p१.jpg-
26O55811
दापोली ः विजेत्या विद्यार्थ्यांसमवेत संस्थेचे सर्व पदाधिकारी व शिक्षक.
----
‘दापोली महाविद्यालया’ची विजयी भरारी
आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सवात ११ पारितोषिके
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. ७ ः मुंबई विद्यापीठाच्या ५९व्या आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सवाची ‘उत्तर रत्नागिरी विभागीय फेरी’ लवेल येथील घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये उत्साहात पार पडली. या फेरीत दापोली एज्युकेशन सोसायटीच्या दापोली अर्बन बँक सीनियर सायन्स कॉलेजने विविध कला प्रकारांत एकूण ११ पारितोषिके पटकावून उल्लेखनीय यश मिळवले.
यामध्ये वक्तृत्व गट अ ः जान्हवी डोंगरे (प्रथम), गट ब : साईश्वरी पाटणे (प्रथम), वादविवाद (गट अ) : पार्थ सामल व जान्हवी डोंगरे (तृतीय), गट ब : पार्थ सामल व रासिका बर्वे (द्वितीय), कथाकथन (गट अ) ः श्रुती येलवे (तृतीय), गट ब : सफा ए. के. (द्वितीय) यांनी यश मिळवले. तसेच ललित कला विभागात सिद्धी मर्चंडे हिने दुहेरी यश मिळवत व्यंगचित्र स्पर्धेत उत्तेजनार्थ तर स्थळचित्रकला स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. संगीत विभागात तालवाद्य एकलमध्ये शार्दूल आठल्ये याने तृतीय क्रमांक मिळवला असून, या वेळी त्याला साथसंगत मकरंद सोमण यांनी दिली होती. पाश्चात्त्य वाद्य एकल स्पर्धेत आयुष मुलुखने तृतीय क्रमांक पटकावला.
भारतीय समूहगीतात पार्थ गावडे, शार्दूल आठल्ये, कांचन आंबेकर, दिविज खेडेकर आणि ऋत्वी टिकेकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. या कार्यक्रमाचे सादरीकरण करताना साथसंगत आयुष मुलुख, वेदांत साठे, जय जाधव व मंथन मुलुख यांनी दिली होती.
विद्यार्थ्याना सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. कैलास गांधी, प्रा. संतोष मराठे, प्रा. तेजस मेहता, प्रा. अजिंक्य मुलुख, प्रा. अनिरुद्ध सुतार, प्रा. विश्वेश जोशी, प्रा. जान्हवी दिवेकर, प्रा. स्वाती देपोलकर आणि प्रा. सिद्धी साळगावकर यांचे मार्गदर्शन लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.