कोकण

गुहागर ः आरजीपीपीएलकडून 3 ग्रामपंचायतींना 7 कोटी अदा

CD

‘आरजीपीपीएल’ने भरला
७ कोटींचा थकीत कर
जप्तीची नामुष्की अखेर टळली
गुहागर, ता. ७ ः गुहागर तालुक्यातील ‘रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड’ (आरजीपीपीएल) कंपनीने अखेर नरमाईची भूमिका घेत अंजनवेल, वेलदूर आणि रानवी या तीन ग्रामपंचायतींचा तब्बल ७ कोटी १ लाख २० हजार ७२७ रुपयांचा थकीत कर आदा केला आहे. कंपनीने कर भरल्यामुळे ग्रामपंचायतींकडून होणारी जप्तीची नामुष्की अखेर टळली आहे.
सरकारी कंपनी असल्याचे सांगत ‘आरजीपीपीएल’ने गेली चार वर्षे इमारती व जमिनीचा कर देण्यास नकार दिला होता. या प्रकरणी पंचायत समिती व जिल्हा परिषदेत झालेल्या सुनावणीचा निकाल तिन्ही ग्रामपंचायतींच्या बाजूने लागला होता. तरीही कंपनीने या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. कंपनीच्या या आडमुठ्या धोरणामुळे संतप्त झालेल्या ग्रामपंचायतींनी २८ जुलैला कंपनीवर जप्तीची कारवाई करण्याचा इशारा दिला होता. जप्तीच्या कारवाईच्या इशाऱ्यानंतर कंपनी प्रशासनाने नरमाईची भूमिका घेतली. एकूण थकीत करांपैकी ५० टक्के रक्कम त्वरित देण्याचा प्रस्ताव ठेवत कारवाई स्थगित करण्याची विनंती कंपनीने केली. यानुसार कंपनीने २०२१-२२ ते २०२६-२७ या सहा वर्षांच्या थकीत करापोटी ५० टक्के रक्कम ग्रामपंचायतींच्या खात्यात वर्ग केली आहे. या प्रसंगी गौरव वेल्हाळ, मंगेश जोशी, सारिका दाभोळकर, अंजनवेलच्या सरपंच सोनाली मोरे, रानवीच्या सरपंच मनाली कदम, वेलदूरच्या सरपंच दिव्या वनकर, बाळकृष्ण सुर्वे, यशवंत बाईत, इकबाल पंची उपस्थित होते.

चौकट
कोणत्या ग्रामपंचायतीला किती कर मिळाला?
* अंजनवेल ः ४ कोटी ७५ लाख ५४ हजार १५८ रुपये
* रानवी ः १ कोटी २४ लाख ३७ हजार ४२ रुपये
* वेलदूर ः १ कोटी १ लाख २९ हजार ५२७ रुपये
-----
चौकट
गटविकास अधिकाऱ्यांचा तोडगा

प्रशासकीय पातळीवर गटविकास अधिकाऱ्यांनी कंपनी प्रतिनिधी अतुल देसाई आणि तिन्ही ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन हा सकारात्मक तोडगा काढला. या यशामुळे तिन्ही सरपंचांचा सत्कार करताना गुहागर पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर व उपसभापती नीलेश सुर्वे म्हणाले, कोणताही राजकीय हस्तक्षेप न होता सरपंच, सदस्य आणि ग्रामस्थांच्या एकजुटीमुळेच हा करवसुलीचा लढा यशस्वी झाला आहे. उर्वरित ५० टक्के करवसुलीसाठीही पंचायत समिती पूर्ण पाठीशी राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Video: कारच्या 'फ्यूल टँक'ची कॅप उघडली अन् सरकारवर बरसले! राहुल गांधींचा E20 वर व्हिडीओ

Karanja Crime : गरोदर विवाहीतेच्या संशयास्पद मृत्यूचे गूढ उकलले; सैन्यातील जवान पतीला अटक

नवऱ्यापासून राहतेय वेगळी, कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे अमृता खानविलकर? एका चित्रपटासाठी किती घेते मानधन?

Marathi News Live Updates : तलावात आढळले एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह, आईसह दोन मुलींचा समावेश

MHADA Lottery: सर्वसामान्यांना हक्काचं घर मिळणार! म्हाडा मुंबईत साडेसात लाख घरं बांधणार; नवीन लॉटरी कधी निघणार? तारीख समोर

SCROLL FOR NEXT