

Maharashtra Latest Marathi News Live Update
esakal
नागपूर ः महानगरपालिका आणि ओसीडब्ल्यूतर्फे ‘नागपूर जल ग्राहक सेवा’ या मोबाईल ॲप अद्यावत केले जाणार असल्याने हे ॲप ८ ऑगस्टला मध्यरात्री १२ वाजतापासून १० ऑगस्टच्या मध्यरात्री १२ वाजतापर्यंत तात्पुरते बंद राहणार आहे. या कालावधीत पाणी बिल भरण्यासाठी ऑनलाइन पेमेंटचे इतर सर्व पर्याय सुरळीत सुरू राहतील. त्यामुळे ग्राहकांनी अधिकृत वेब पोर्टलद्वारे पाणी बिलाचा भरणा करावा, https://nagpurjalseva.ocwindia.com या अधिकृत वेब पोर्टलचा वापर करावा. सॉफ्टवेअर अपडेट झाल्यानंतर ॲप पूर्ववत होणार असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.