

Mhada Lottery 2027
ESakal
मुंबई : सर्वसामान्य मुंबईकरांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडाने लॉटरीची सोडत काढली आणि अनेकांच्या स्वप्नातील घराचा दरवाजा उघडला. म्हाडाच्या मुंबई मंडळाने २,६४० घरांच्या विक्रीसाठी काढलेल्या लॉटरीला तब्बल ७५ हजार १२७अर्ज आले होते. म्हाडाच्या या सोडतनंतर आता पुढील लॉटरी कधी निघणार, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात होता. यावर म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.