कोकण

चिपळूणात राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

CD

चिपळुणातील दोन हातभट्ट्यांवर छापे
लाखांचा मुद्देमाल जप्त ; राज्य उत्पादन शुल्कची कारवाई
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ८ : राज्य उत्पादन शुल्क विभागाने चिपळूण तालुक्यात अवैध हातभट्टी दारू निर्मितीविरोधात धडक कारवाई करत दोन ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत दोघांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून, मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारू, रसायन आणि दारूनिर्मितीचे साहित्य असा एक लाख ६ हजार ४५० किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
तालुक्यातील रावळगाव, शिंदेवाडी येथील गुरुनाथ सहदेव हळदणकर यांच्या राहत्या घरामागील जंगल परिसरात अवैध हातभट्टी असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. या बेकायदेशीर हातभट्टी दारूनिर्मिती केंद्रावर छापा टाकून सुमारे १,२०० लिटर रसायन, १०५ लिटर हातभट्टी गावठी दारू आणि दारू निर्मितीचे साहित्य, असा ६५ हजार ९५० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी गुरूनाथ सहदेव हळदणकर (रा. रावळगाव) यांच्याविरूद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दुसरी कारवाई मजरेकाशी गावाच्या हद्दीत वाशिष्ठी नदीकिनारी सुरू असलेल्या हातभट्टी दारूनिर्मिती केंद्रावर छापा टाकला. यामध्ये ९०० लिटर रसायन, ४० लिटर हातभट्टी गावठी दारू तसेच दारूनिर्मितीचे साहित्य, असा ४० हजार ५०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी प्रवीण प्रभाकर पेडणेकर (रा. मजरेकाशी) यांच्याविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई निरीक्षक सुनील आरडेकर, दुय्यम निरीक्षक संजय मालुसरे, साहाय्यक दुय्यम निरीक्षक अर्शद शेख, जवान वैभव सोनावले, शुभम काडापुरे आणि मयूर पुरीबुवा यांनी केली. या दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास निरीक्षक सुनील आरडेकर करत आहेत.

Manchar News : मंचर शहरात खळबळ! ८५ इमारतींना अनधिकृत बांधकामाबाबत नोटिसा; प्रशस्त हॉस्पिटल, हॉटेल, व्यापारी संकुल व गृहनिर्माण संस्थांचा समावेश

काही खोटारड्या लोकांसाठी... वाढदिवसाला प्राजक्ता माळीने घेतला मोठा निर्णय; म्हणाली, 'मला नाईलाजाने...'

Leopard : कांचनपूर परिसरात बिबट्याचाच वावर; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण, वनविभागाकडून पंजांच्या ठशांची पाहणी

VAIBHAV SOORYAVANSHI: क्रिकेट सोडा, वैभवचा ‘हा’ व्हिडिओ पाहून चाहतेही थक्क! वाघाच्या शोधात जंगलात पोहोचला ‘बेबी बॉस’, पण शेवटी...

Crime: भयंकर! ५ रुपये खर्च केले म्हणून आई संतापली; चिमुकल्याला ३ दिवस घरात कोंडलं, नंतर तळव्यांना दिले चटके

SCROLL FOR NEXT