रावळगावात कृषी तंत्रज्ञानाचा जागर
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १० : शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय (खरवते-दहिवली) येथील विद्यार्थिनींनी ‘ग्रामीण कृषी कार्यानुभव’ कार्यक्रमांतर्गत रावळगाव येथे भव्य कृषी प्रदर्शनाचे यशस्वी आयोजन केले. या प्रदर्शनाच्या माध्यमातून परिसरातील शेतकऱ्यांना आधुनिक, शाश्वत आणि पर्यावरणपूरक शेती तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात आली.
प्रदर्शनात एकात्मिक शेतीपद्धती, बायोगॅस संयंत्र, मधमाशीपालन, सेंद्रिय शेती, पीक उत्पादन नियोजन आणि जलसंवर्धनातून पोषणयुक्त पिके घेण्याच्या आधुनिक पद्धतींची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. तसेच सेंद्रिय व रासायनिक खतांचा समतोल वापर, आधुनिक शेती अवजारे, कीड व रोग व्यवस्थापन, बी-बियाणे संकलन आणि स्थानिक रानभाज्यांची ओळख याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रशांत पवार यांनी सेंद्रिय शेतीचे महत्त्व सांगून उपस्थितांना मार्गदर्शन केले. युवापिढीचा शेतीकडे कल वाढवणे आणि थेट शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक कृषी तंत्रज्ञान पोहोचवणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या वेळी शेतकऱ्यांनी कृषीकन्यांशी संवाद साधून विविध तंत्रज्ञानाची कार्यपद्धती व उपयोग जाणून घेतले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनीतकुमार पाटील, प्राध्यापक पाकळे, अमिषा सुर्वे, ज्येष्ठ ग्रामस्थ व शिक्षकवृंद उपस्थित होते. प्रदर्शनाचे यशस्वी नियोजन कृषिकन्या हर्षाली मर्गज, दिव्या वझे, सानिका कोंजे, श्रद्धा झेंडे, सानिया बोर्डे आणि आयुषा निकम यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.