कोकण

सर्व्हिस रोडवर चिखलाचे साम्राज्य

CD

- rat१०p५.JPG-
26O56346
संगमेश्वरकडे जाणाऱ्या सेवारस्त्याची बिकट अवस्था.

संगमेश्वरचा सेवारस्ता बनला डोकेदुखी
जागोजागी चिखल ; नागरिक त्रस्त; ठेकेदारासह महामार्ग विभागाकडून दुरुस्तीची अपेक्षा
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १० : संगमेश्वर शहराकडे जाणाऱ्या सेवारस्त्याची पावसाळ्यात अक्षरशः चिखलमय अवस्था झाली आहे. पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे डांबरीकरण करून तो वाहतुकीस योग्य करणे अपेक्षित असताना ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे रस्त्यावर चिखल, माती आणि पाण्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे वाहनचालक व नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
सेवारस्त्यावरून प्रवास करताना दुचाकी घसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यावरील मातीमिश्रित चिखलात वाहनांची चाके रुतत असल्याने हा मार्ग दररोजची डोकेदुखी बनला आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी डांबरीकरण करणे ही ठेकेदाराची जबाबदारी होती; मात्र ती पार पाडण्यात ठेकेदार सपशेल अपयशी ठरला आहे. स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
ठेकेदाराच्या निकृष्ट आणि रखडलेल्या कामावर संबंधित यंत्रणा व लोकप्रतिनिधींचे कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही, असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. ‘एखादा मोठा अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?’ असा संतप्त सवाल प्रवाशांमधून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, संबंधित सेवारस्त्यावरील चिखल तातडीने हटवून डांबरीकरणाचे काम पूर्ण करावे आणि निष्काळजी ठेकेदारावर कडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी संगमेश्वरवासियांकडून केली जात आहे.
---
कोट
महामार्गासंदर्भातील विविध समस्यांवर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासन गंभीर झाले पाहिजे. महामार्गाचे संगमेश्वर टप्प्यातील कामाबाबत गांभीर्य नसल्याने हे प्रश्न सोडवण्याऐवजी ‘जैसे थे’च ठेवले जातात.

- संतोष थेराडे, सदस्य, जिल्हा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांनो लक्ष द्या! Meesho वरून खरेदी करता? तर आधी 'ही' बातमी नक्की वाचा; हायकोर्टाचा मोठा निर्णय

Samruddhi Mahamarg News: महामार्गावर नेमकं काय घडलं? RTO अधिकाऱ्यांनी केला मोठा खुलासा; म्हणाले, ''ट्रक चालकाने...''

Tukaram Mundhe: “चहा घेणार का? मी बनवतोय" FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ज्याच्यासाठी बनवला चहा तो मित्र कोण?

Marathi News Live Updates : झारखंड लोकसेवा आयोगाच्या माजी अध्यक्षांना अटक; CID ने घेतलं ताब्यात

Vastu Tips: घरामध्ये मोरपीस ठेवावे की नाही? वास्तूशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे आणि नियम

SCROLL FOR NEXT