कोकण

तालुक्यात अंड्यांच्या दरात वाढ

CD

चिपळुणात अंड्यांच्या दरात वाढ
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १० : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून अंड्यांच्या दरात अचानक वाढ झाली आहे. प्रति अंड्यामागे सुमारे दोन रुपयांची वाढ झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांसह हॉटेल व्यावसायिक व किरकोळ विक्रेत्यांना चांगलाच फटका बसत आहे.
सकाळच्या नाश्त्यापासून ते उपाहारगृहे आणि बेकरी व्यवसायापर्यंत अंड्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे ही दरवाढ थेट दैनंदिन खर्चावर परिणाम करणारी ठरली आहे. वाहतूकखर्चात झालेली वाढ, कोंबड्यांच्या खाद्याच्या वाढलेल्या किमती, उत्पादन खर्चातील वाढ आणि बाजारातील बदलता पुरवठा यामुळे घाऊक बाजारातच अंडी महागल्याचे स्थानिक विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. घाऊक बाजारातूनच वाढीव दराने माल मिळत असल्याने किरकोळ विक्रेत्यांनाही दर वाढवणे भाग पडत आहे. या दरवाढीमुळे ऑम्लेट, बुर्जीसारख्या अंड्यांच्या खाद्यपदार्थांचे दर वाढण्याची शक्यता हॉटेल व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, अंड्यांच्या किमतीतील ही तेजी काही दिवस कायम राहणार की, पुरवठा सुरळीत झाल्यानंतर दर पूर्ववत होणार, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांनो लक्ष द्या! Meesho वरून खरेदी करता? तर आधी 'ही' बातमी नक्की वाचा; हायकोर्टाचा मोठा निर्णय

Samruddhi Mahamarg News: महामार्गावर नेमकं काय घडलं? RTO अधिकाऱ्यांनी केला मोठा खुलासा; म्हणाले, ''ट्रक चालकाने...''

Tukaram Mundhe: “चहा घेणार का? मी बनवतोय" FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ज्याच्यासाठी बनवला चहा तो मित्र कोण?

Marathi News Live Updates : झारखंड लोकसेवा आयोगाच्या माजी अध्यक्षांना अटक; CID ने घेतलं ताब्यात

Vastu Tips: घरामध्ये मोरपीस ठेवावे की नाही? वास्तूशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे आणि नियम

SCROLL FOR NEXT