कोकण

राज्यस्तरीय स्पर्धेत

CD

चिन्मयी-पृथ्वीची राज्यस्तरीय भरारी
सावर्डे, ता. ११ ः डेरवण येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स मैदानी स्पर्धेत चिन्मयी शिगवण हिने १४ वर्षे वयोगटातील मुलींच्या गटात ६० मीटर धावणे, ६०० मीटर धावणे आणि लांब उडी या तिन्ही क्रीडाप्रकारांत प्रथम क्रमांक पटकावला तर पृथ्वी राजभर याने १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या १ हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला.
या दोघांची राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे. हे दोघेही सावर्डे येथील गोविंदराव निकम माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी आहेत. डेरवण येथे २७, २८ व ३० ऑगस्ट रोजी ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत १४, १६ व १८ वर्षे वयोगटातील तब्बल ४५४ खेळाडूंनी सहभाग घेतला. दोन्ही खेळाडूंचे सह्याद्री शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष आमदार शेखर निकम, संस्थेचे कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम, सचिव महेश महाडिक, प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक महेश कुलकर्णी, अशोक शितोळे यांनी कौतुक केले. या खेळाडूंना क्रीडा मार्गदर्शक दादासाहेब पांढरे, अमृत कडगावे व रोहित गमरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
----
गुहागर-रामपूर रुग्णालयांची
आरोग्य संचालकांकडून पाहणी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण : गुहागर विधानसभा क्षेत्रातील श्रेणीवर्धीत ग्रामीण रुग्णालयांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आरोग्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीत आमदार भास्कर जाधव यांच्या मागणीनुसार राज्याचे आरोग्य संचालक विजय कंदेवाड यांनी नुकतीच गुहागर आणि रामपूर (ता. चिपळूण) या ग्रामीण रुग्णालयांची पाहणी केली. त्यानंतर आमदार जाधव यांची भेट घेऊन या दोन्ही रुग्णालयांच्या जागेचा प्रश्न सुटल्याची माहिती त्यांना दिली. वावे (ता. खेड) रुग्णालयाच्या संदर्भातील सर्व प्रश्न आधीच मार्गी लागले असून, इमारत बांधकामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मागील बैठकीत दिलेले असल्यामुळे आता ही सर्व रुग्णालये सुसज्ज उभी राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गुहागर मतदार संघातील संबंधित रुग्णालयांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत स्वतंत्र बैठकीचे आयोजन करण्याची मागणी आमदार जाधव यांनी आरोग्यमंत्री आबिटकर यांच्याकडे केली होती. अधिवेशन संपताच रामपूर, गुहागर रुग्णालयांचा जागेचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्यक्ष पाहणी करून तत्काळ पुढील कार्यवाही करावी, अशी सूचना मंत्री आबिटकर यांनी आरोग्य संचालक डॉ. विजय कंदेवाड यांना केली होती. त्यानुसार ही पाहणी करण्यात आली. दोन्ही ठिकाणच्या जागा ताब्यात घेण्याबाबत ठराव करून घेऊन त्या शासनाच्या नावावर करून घेण्याची जबाबदारी आमदार जाधव यांनी विधानभवनात झालेल्या बैठकीत घेतली होती. त्यानुसार कार्यवाही सुरु झाली आहे. या पाहणीवेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजयकुमार कांबळे, डॉ. बळवंत, चिपळूण तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Supreme Court hearing : कलम १९(c) वरून सुप्रीम कोर्टात खडाजंगी; सिब्बल यांच्या युक्तिवाद, त्यावर न्यायाधीशांचे प्रतिप्रश्न, वाचा नेमकं काय घडलं?

"तयारी सुरू..." Vaibhav Sooryavanshi च्या अवघ्या दोन शब्दांच्या पोस्टने वेधलं लक्ष; Video शेअर करत प्रतिस्पर्ध्यांना इशारा

Marathi News Live Updates : हार्बर लोकल पावसामुळे 10-15 मिनिटं उशीराने

Pune Crime : धर्मप्रसाराच्या आरोपावरुन ब्रिटनमधील धर्मगुरुवर गुन्हा दाखल

Supreme Court: राष्ट्रीय महामार्गांवरील ढाब्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा हातोडा, कारवाईमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT