कोकण

ज्ञानदीपच्या ३६ जणांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

CD

ज्ञानदीपच्या ३६ जणांना
राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
खेड ः रा. धोईं. पाटणे ज्ञानदीप विद्यामंदिरमधील ३६ विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट गाईडअंतर्गत कब व बुलबुलना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. अंश आखाडे, सार्थ बोदगिरे, दुर्गेश दरेकर, रूद्र डेडवाल, ईशान देसाई, हर्ष देशमुख, ओम गांधी, विहान गांधी, श्लोक घुगे, अजिंक्य धुले, मयंक जाधव, विहान कावणकर, युवराज खालकर, स्वराज मनवळ, समर निकम, स्वरूप निकम, यशवर्धन पाटील, अवधूत पवार, विहान शिबे या कबना सुवर्णबाण राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. सुवर्णबाण राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त बुलबुलमध्ये शरयू अलमोड, आराध्या भोसले, सानवी भुवड, देवश्री चव्हाण, श्लोक चव्हाण, श्रावणी चव्हाण, शरण्या दळवी, मनस्वी दामले, समृद्धी गावित, ईश्वरी हटकर, मनस्वी जाधव, स्वरा काटकर, सानवी मोरे, अमृता पवार, स्पृहा पवार, अन्वी पिंपळकर, आराध्या उबाळे या विद्यार्थिनींचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना कब मास्तर विजय शिंदे, योगेश चिले, सचिन बेर्डे, राजेंद्र नाटेकर, फ्लॉक लिडर पूर्वा मोरे, सुनयना सावंत, प्रज्ञा मोरे, अंजली जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
-------------
ratchl११३.jpg-
56620
सान्वी गोरे

सान्वी गोरे हिचे
‘शिष्यवृत्ती’त यश
चिपळूण ः प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (चौथी) सान्वी सुनील गोरे हिने रत्नागिरी जिल्हा शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत जिल्ह्यात ४२ वा, तर तालुक्यात सातवा क्रमांक मिळवला. ती चिपळूणातील प्रेमजीभाई आसर प्राथमिक विद्यालयात शिकत आहे. कोणतीही खासगी शिकवणी न लावता तिने स्वतःच्या मेहनतीवर हे यश मिळवले. तिला मुख्याध्यापिका सौ. संगिता नाईक, शिक्षक श्री. मांडवकर, सौ. गगनग्रास यांचे मार्गदर्शन मिळाले. सान्वी ही चिपळूण पंचायत समितीमधील वरिष्ठ सहायक सुनील गोरे यांची कन्या आहे.
---------------
प्रधानमंत्री शिष्यवृत्ती
योजनेसाठी अर्ज करा
रत्नागिरी ः प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेसाठी नवीन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. माजी सैनिकांच्या पात्र पाल्यांनी www.ksb.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करून आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे अपलोड करावीत. अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर आहे. पात्र विद्यार्थ्यांनी मुदतीपूर्वी अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.
----------
खेडमधील आजचा
रोजगार मेळावा लांबणीवर
रत्नागिरी ः जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे खेड तालुक्यातील भरणे येथे १२ ऑगस्टला आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आला आहे. या मेळाव्याची नवीन तारीख आणि ठिकाण यथावकाश जाहीर करण्यात येईल.
---------
ग्राहक संरक्षण परिषदेवर
अशासकीय सदस्य
रत्नागिरी ः ग्राहक संरक्षण अधिनियम, २०१९ अन्वये ग्राहकांच्या हक्कांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी जिल्हा स्तरावर ‘ग्राहक संरक्षण परिषद’ गठीत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या परिषदेतील अशासकीय सदस्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने, पुढील तीन वर्षांच्या कालावधीसाठी १० विविध प्रवर्गांमधून एकूण २८ अशासकीय सदस्यांची नव्याने निवड केली जाणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुकांनी पूर्ण भरलेले लेखी अर्ज आवश्यक कागदपत्रांसह जिल्हाधिकारी कार्यालयात आजपासून ३० दिवसांच्या आत सादर करायचे आहेत. मुदतीनंतर प्राप्त होणारे किंवा अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, असे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी कळविले आहे. अर्जाचा विहीत नमुना (परिशिष्ट-अ), आवश्यक कागदपत्रांची यादी (परिशिष्ट-ब) आणि संबंधित शासन निर्णय जिल्ह्याचे अधिकृत संकेतस्थळ www.ratnagiri.nic.in वर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik News : महाडीबीटीचे पोर्टल अडीच महिन्‍यांपासून ठप्प! सुमारे ७२ शासकीय योजनांचा बोजवारा; विद्यार्थी-संस्‍थाचालकांना मनस्‍ताप

Marathi News Live Updates : हार्बर लोकल पावसामुळे 10-15 मिनिटं उशीराने

Jalgaon News : तरुण उद्योजकाने सात लाखांसाठी संपविले जीवन; सुसाईड नोट लिहून घेतला गळफास

Jalgaon News : ‘उमेद’च्या बळावर जळगावची नारीशक्ती आत्मनिर्भरतेकडे; तब्बल ३१ हजारांहून अधिक बचतगटांचे जाळे, साडेचारशे कोटींहून अधिक कर्ज वितरित

Shiv Sena Supreme Court hearing : कलम १९(c) वरून सुप्रीम कोर्टात खडाजंगी; सिब्बल यांच्या युक्तिवाद, त्यावर न्यायाधीशांचे प्रतिप्रश्न, वाचा नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT