कोकण

प्रशासकीय उदासीनतेमुळे घरकुल योजना रखडली

CD

26O56999
एआय चित्र
घरकुलाची मोफत वाळू कागदावरच!
केवळ २,२०९ लाभार्थ्यांची ‘महाखनिज’वर नोंदणी; प्रशासकीय उदासीनता
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ : शासनाच्या घरकुल योजनेंतर्गत घर बांधणाऱ्या लाभार्थ्यांना पाच ब्रासपर्यंत विनामूल्य वाळू देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय प्रशासकीय अनास्था आणि समन्वयाच्या अभावामुळे कागदावरच राहिल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे. ३० एप्रिल २०२५ ला या संदर्भातील अंमलबजावणीचे आदेश देऊनही, जिल्ह्यातील १८ हजार ६७१ मंजूर घरकुलांपैकी अवघ्या २ हजार २०९ लाभार्थ्यांनीच ‘महाखनिज’ प्रणालीवर नोंदणी केली आहे. २४ जुलै पर्यंतच्या सरकारी आकडेवारीवरून ही बाब समोर आली आहे.
जिल्ह्यात मंजूर १८ हजार ६७१ घरकुलांसाठी तब्बल ९७ हजार ५५५ ब्रास वाळूची आवश्यकता आहे; मात्र, प्रत्यक्षात केवळ १० हजार ११४ ब्रास वाळू बुक करण्यात आली. त्यापैकी अवघ्या ९ हजार २८७ ब्रास वाळूचीच उचल झाली आहे. तालुकानिहाय परिस्थिती पाहता दापोली, लांजा आणि राजापूर तालुक्यांत एकाही लाभार्थ्याने वाळूसाठी नोंदणी केलेली नाही आणि तेथील वाळूची उचल शून्य आहे. मंडणगड, गुहागर, रत्नागिरी आणि संगमेश्वर या तालुक्यांतही वाळूची उचल अत्यंत नगण्य स्वरूपात झाली आहे. जिल्ह्यात केवळ चिपळूण आणि खेड तालुक्यांत या योजनेला काही प्रमाणात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. चिपळूण तालुक्यात तीन हजार ३४३ मंजूर घरकुलांपैकी ६०८ लाभार्थ्यांनी नोंदणी करून २ हजार ६८७ ब्रास वाळूची उचल केली आहे. खेड तालुक्यात ६०९ लाभार्थ्यांनी २ हजार ४२९ ब्रास वाळू मिळवली आहे. इतर तालुक्यांच्या तुलनेत या दोन तालुक्यांतील कामगिरी बऱ्यापैकी असली तरी ती एकूण उद्दिष्टाच्या मानाने पुरेशी नाही.
---
जनजागृतीचा अभाव ठरतोय अडसर
शासनाने बेघर आणि गरजू घटकांना हक्काचे घर उभारता यावे म्हणून पाच ब्रास मोफत वाळूची महत्त्वपूर्ण सुविधा उपलब्ध करून दिली आहे; मात्र, महाखनिज प्रणालीची क्लिष्टता, योग्य माहितीचा अभाव आणि महसूल व ग्रामविकास यंत्रणेतील समन्वयाची त्रुटी यामुळे हा लाभ गरजूंपर्यंत पोहोचलेला नाही. ज्या तालुक्यांत नोंदणी आणि वाळू उचल शून्य आहे तिथे विशेष मोहीम राबवून लाभार्थ्यांना ही सुविधा मिळवून दिली नाही तर चालू वर्षात जिल्ह्यातील शेकडो घरकुले अपूर्ण राहण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule: बावनकुळेंच्या डोळ्यात पाणी! मनोज जरांगेंच्या टीकेमुळे भावुक; म्हणाले, माझंही कुटुंब आहे...

Vaibhav Sooryavanshi : भल्याभल्या गोलंदाजांना घाम फोडणाऱ्या वैभवला कसा रोखणार? हरभजनने सांगितलं गेमप्लॅन

Bhiwandi: भिवंडी महापालिकेला 'सर्वोच्च' दणका! कचरा उचलणाऱ्या कंत्राटदारास १५ कोटी देण्याचे न्यायालयाचे निर्देश

Latest Marathi News Live Update : कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरुन चौकशी लावली- बावनकुळे

Jharkhand Naxal-Free Push: झारखंड नक्षलमुक्तीकडे मोठे पाऊल; चाईबासाही नक्षलग्रस्त जिल्ह्यांच्या यादीतून बाहेर

SCROLL FOR NEXT