कोकण

सातार्ड्यात विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

CD

57292

सातार्ड्यात विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

सामाजिक बांधिलकी : योगेश मांजरेकर यांच्या स्मृतींना उजाळा

सकाळ वृत्तसेवा
आरोंदा, ता. १४ : सातार्डा गावचे सुपुत्र कै. योगेश मांजरेकर यांचे काही महिन्यांपूर्वी अकाली निधन झाले. त्यांच्या स्मृतींना उजाळा देत मांजरेकर कुटुंबीयांनी सातार्डा महात्मा गांधी हायस्कूलमधील नवोदित विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली. या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत मांजरेकर कुटुंबीयांनी चांगले दातृत्व सिद्ध केले आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर यांनी केले.
कै. योगेश मांजरेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे बंधू पृथ्वीराज मांजरेकर यांच्या पुढाकाराने गणवेश वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर माजी महिला व बालकल्याण सभापती शर्वाणी गावकर, शाळा समिती अध्यक्ष बाळा मांजरेकर, कवठणी सरपंच अजित कवठणकर, सातार्डा ग्रामपंचायत सदस्या शर्मिला मांजरेकर, कवठणी ग्रामपंचायत सदस्य अजय सावंत, शिंदे शिवसेनेच्या सावंतवाडी महिला उपाध्यक्षा सृष्टी वेंगुर्लेकर, राजाराम आरोंदेकर, नारायण बागकर, कविता राऊत, पृथ्वीराज मांजरेकर, मकरंद मांजरेकर, उमेश मांजरेकर, राजन हळदणकर, अमेय सातार्डेकर तसेच मुख्याध्यापक प्रशांत सावंत उपस्थित होते. यावेळी सुदन कवठणकर म्हणाले की, कै. योगेश मांजरेकर यांच्या कुटुंबीयांनी विद्यार्थ्यांना गणवेश देऊन त्यांना प्रोत्साहन दिले आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीत मदतीचा हात पुढे करून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. कार्यक्रमाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रकाश कवठणकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी शर्वाणी गावकर, कविता राऊत, पृथ्वीराज मांजरेकर आणि उमेश मांजरेकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका शर्वरी जाधव यांनी केले, तर शिक्षक नाना शिर्के यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Laxman Hake: आता बस झालं..आम्ही हरलो आहोत! ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा मोठा निर्णय

रश्मिका मंदानाने पहिल्यांदाच दाखवलं तिचं मंगळसूत्र; इतकं साधं अन् सुंदर की जान्हवीचं मंगळसूत्रही विसराल!

Stray Dog Attack : आईसोबत चाललेल्या मुलावर मोकाट कुत्र्यांचा हल्ला; प्रसंगावधान राखून आईने स्वतःच्या अंगावर हल्ला झेलत मुलाचे प्राण वाचवले, झटापटीत आई गंभीर जखमी

Marathi News Live Updates :  दोन-चार दिवसांत 5 ते 10 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील, कृषीमंत्र्यांची घोषणा 

Abhijeet Dipke: जंतर-मंतर आंदोलनानंतर आता शाळांवर अभिजीत दिपकेंचा फोकस! शाळा सुधारा अभियान राबवणार; 'या' जिल्ह्यातून शुभारंभ होणार

SCROLL FOR NEXT