कोकण

बाजारात भाज्यांचे दर नियंत्रणात

CD

चिपळुणात भाज्यांचे दर नियंत्रणात
ग्राहकांना दिलासा; मांसाहारी पदार्थांचे दर घसरले
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २१ ः श्रावण महिना सुरू झाल्यामुळे चिपळूण बाजारात मांसाहाराची मागणी घटली असून अंडी, चिकन आणि मासळीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. नेहमी श्रावणात भाज्यांचे दर भडकतात; मात्र यंदा भाज्यांचे दर स्थिर राहिल्याने सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
काही महिन्यांपूर्वी मागणी वाढल्यामुळे अंड्यांचा दर प्रतिशेकडा ७६० रुपयांपर्यंत पोहोचला होता, तो आता ५५० रुपयांवर आला आहे. तसेच २६० ते २८० रुपये किलो मिळणारे चिकन आता १६० ते २०० रुपये किलोने विकले जात आहे. पावसाळी बंदीनंतर आता बाजारात नवी मासळी येण्यास सुरुवात झाली आहे. श्रावणामुळे दर नियंत्रणात असले तरी मासेशौकिनांकडून मागणी चांगली आहे. बाजारात सुरमई ४०० रुपये, पापलेट १ हजार रुपये, कोळंबी २५० ते ३०० रुपये, मुशी किंवा राजाराणी २००, बांगडा १८०, बोंबील १६०, मांदेली १०० तर खेकडे १०० ते ४०० रुपयांनी विक्री केले जात आहेत. मांसाहाराचे दर उतरले असले तरी मटणाचा दर मात्र प्रतिकिलो ९६० रुपयांवर स्थिर आहे तरीही श्रावणामुळे मटणाची विक्री घटली आहे. श्रावणात भाज्या महागण्याचा नेहमीचा पायंडा यंदा मोडीत निघाला आहे. भाजी विक्रेते दस्तगीर मरतगी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या बाजारात भाज्यांचे दर स्थिर आहेत.
---
भाज्यांचे दर
* टोमॅटो २५ रुपये १ किलो
* कोबी ४० रुपये किलो
* काकडी, गाजर ५० रुपये किलो
* कारली व फ्लॉवर ६० रुपये किलो
* मिरची, गवार, फरसबी ८० रुपये किलो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Nutritious Diet : शालेय पोषण आहारात निकृष्ट दर्जाचे व भेसळयुक्त अन्नधान्य येत असल्याचे ग्रामस्थांचे आरोप; काळवाडी ग्रामस्थांचा पोषण आहारावर बहिष्कार

झुरळ पाहून श्वेता तिवारी घाबरली! म्हणाली, ‘तुकाराम मुंढे जी, तुम्ही कुठे आहात?’ Viral Video

Marathi News Live Updates : दिल्ली विद्यापीठाने चार वर्षांचा पदवीपूर्व अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी थेट पीएचडी प्रवेशाची सुविधा जाहीर केली

Baramati Accident : बारामतीनजिक हायवाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; मित्र गंभीर जखमी...

Nirgudsar News : व्हिडिओ चित्रीकरण व वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारास मारहाण

SCROLL FOR NEXT