कुपोषित बालकांसाठी
पौष्टिक लाडू वाटप
खेड ः कळंबणी ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात तालुक्यातील कुपोषित बालकांसाठी बालरोग तज्ञांकडून तपासणी व पौष्टिक लाडू वाटप कॅम्प उत्साहात पार पडला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांच्या मार्गदर्शनानुसार कुपोषित बालकांना पौष्टिक लाडू वाटप कॅम्प तसेच कुपोषित बालकांसाठी पूरक पोषण आहार या संदर्भात डॉ. जगताप यांनी मार्गदर्शन केले. शिबिरात आलेल्या बालकांना जंतूनाशक औषधे, प्रोटीन पावडर, रक्तवाढीची औषधे, टॉनिकची औषधे देण्यात आली. डॉ. विलास शेळके यांनी कुपोषण मुक्तीच्या अनुषंगाने स्वच्छता, पूरक पोषण आहार, लसीकरण तसेच बालकाची वजन, उंची, दंडघेर मोजणे महत्वाच्या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी डॉ. बालाजी सगरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भालेराव आदी उपस्थित होते.