कोकण

साखरपा-रत्नागिरी एस.टी. बंदचा फटका

CD

साखरपा-रत्नागिरी
एस.टी. बंदचा फटका
पासधारक त्रस्त ; रत्नागिरी आगाराचा कारभार
साखरपा, ता. २३ ः साखरपा ते रत्नागिरी अशी नियमित चालू असलेली सकाळची साडेसात वाजताची एस.टी. गेले काही दिवस बंद केल्याने त्या गाडीने नियमित साखरप्यातुन रत्नागिरी कडे जाणाऱ्या कार्यालयीन व विद्यार्थी वर्गाचे मोठे हाल होत असून ही बस त्वरित चालू करावी अशी मागणी साखरपा परिसरातील व या मार्गाने जाणाऱ्या सर्व प्रवासी वर्गाची आहे.
अतिवृष्टीमुळे आंबा घाटातील परिस्थिती व बंद पडलेली वाहतूक त्यामुळे साखरपा ते रत्नागिरी अशी सकाळी साडे सात वाजता सुटणारी एस.टी.अचानक बंद केल्याने कार्यालयीन कामकाज करणाऱ्या विद्यार्थी वर्ग, आजारी व्यक्ती व इतर कामकाज करणाऱ्या प्रवासी वर्गाचे हाल होत आहेत हा सर्व रत्नागिरी आगाराचा मनमानी कारभार असून त्याबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच साखरपा ते रत्नागिरी नेहमी प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडे एस.टी.चा पास असतो मात्र तो पास कोल्हापूर वरून रत्नागिरीकडे जाणाऱ्या एस. टी.वाहकांना चालत नसल्याचे प्रवासी वर्गातून सांगितले जाते. देवरुख आगारातून काढलेला पास कोल्हापुर बसला चालत नसल्याचे येथील प्रवासी वर्गांचे म्हणणे आहे. या बाबत या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवासी वर्गांचा मासिक पास का चालत नाही याचे कारण काय? याची माहिती मिळणे गरजेचे आहे. वरिष्ठ पातळीवरून याबाबत चौकशी व्हावी अशी मागणी या मार्गावर जाणाऱ्या पास धारक प्रवासी वर्गातून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

देशात H1N1चा फैलाव; नवा स्ट्रेन की जुना विषाणू? ICMRने सांगितलं सत्य, वैज्ञानिकांनी दिली महत्त्वाची माहिती

Marathi News Live Updates : ग्रामसेवकांच्या गैरहजेरीला आता लगाम! बायोमेट्रिकसह GPS हजेरी बंधनकारक, नियम मोडल्यास होणार कारवाई

MPSC Success Story: शेतकरी कुटुंबातील लेकीची मोठी झेप! नेहा पिसाळ राज्य कर निरीक्षकपदी, जिद्दीला मिळाली यशाची पावती..

Vastu shastra: घरात लाकडी देवघर ठेवताय? वास्तुनुसार जाणून घ्या देवघर ठेवण्याची योग्य दिशा,उंची अन् स्वच्छतेचे नियम! 

IND vs SL, 2nd Test: पडिक्कलने सलग दुसरं शतक करत ८ वर्षांचा दुष्काळ संपवला! शुभमन गिलचीही फिफ्टी, पहिल्या दिवसावर भारताचे वर्चस्व

SCROLL FOR NEXT