कोकण

मासळीची आवक घटली, दर वधारले

CD

रत्नागिरीत मासळीची आवक घटली
वातावरणाचा परिणाम; जाळ्यांचे होतेय नुकसान
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ : पावसाळी मासेमारी बंदी संपल्यानंतर मच्छीमार नौकांच्या मासेमारीचे पहिले काही दिवस चांगले गेले; मात्र, त्यानंतर समुद्रातील वातावरण खवळलेले असल्याने अनेक नौका समुद्रात मासेमारीसाठी जाऊ शकलेल्या नाहीत. ज्या नौका समुद्रात मासेमारीसाठी गेल्या त्यांना पुरेशी मासळी न मिळाल्याने मासळीचे दर वधारले आहेत.
पावसाळी मासेमारी बंदी १ ऑगस्ट रोजी संपली तर, राज्याच्या हद्दीत १५ ऑगस्ट पासून मासेमारीला सुरुवात झाली. नौका मासेमारीसाठी समुद्रात जाऊ लागल्या आहेत; मात्र लगेचच वातावरणातील बिघाडामुळे हवामान विभागाने धोक्याचा इशारा दिला होता. त्यामुळे नौका बंदरातच उभ्या आहेत. समुद्रात उंच लाटा पाहायला मिळत आहेत. समुद्रात टाकलेल्या जाळ्यात मासे मिळत नसल्याने मच्छीमारांना रिकामे माघारी परतावे लागते. तसेच पाण्याला प्रचंड करंट असल्याने जाळ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे मासेमारीत अडथळे निर्माण झालेले आहेत. काही मच्छीमारांना केंड माशाव्यतिरिक्त इतर चविष्ट मासळी फारच कमी प्रमाणात मिळत आहे. केंड मासा फिशमिल कंपन्यांना विकला जातो. काही मच्छीमारांच्या जाळ्यात लेप जातीचा मासा बऱ्यापैकी मिळाला आहे. खवय्यांना आवडणारी मासळी मिळालीच नसल्याने मार्केटमध्ये आलेल्या माशांचे दर चढे आहेत. यामध्ये पापलेटचा किलोचा दर १ हजार रुपये इतका होता. लहान सुरमई ६०० रुपये किलो दराने मिळत होत्या. बांगडा १३० ते १५० रुपये तर सौंदाळा आकारानुसार ३०० ते ३५० रुपये दराने विकला जात होता. लहान कोळंबीचा १ किलोचा दर २५० रुपये तर मोठ्या कोळंबीचा दर ४०० रुपये इतका होता.
---
मागणीवरही परिणाम
श्रावण महिना हा व्रतवैकल्यांचा म्हणून ओळखला जातो. या कालावधीत मांसाहार केला जात नाही. गावागावामध्ये मंदिरात सप्ते, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन सुरू आहे. त्यामुळे मासळीच्या मागणीवरही काही प्रमाणात परिणाम झालेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिकमधील कुंभमेळ्यावर कोट्यवधींचा खर्च, मात्र राज्यातल्या मराठी १२५ शाळा बंद; SC न्यायमूर्तींनी सुनावले खडे बोल

Maratha Reservation: जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचे शिष्टमंडळ अंतरवाली सराटीत; मंत्री विखे पाटील, सामंत, देसाईंची चर्चा

Duleep Trophy 2026 : इशान किशनची यष्टीमागे कमाल; वाऱ्याच्या वेगाने केली स्टम्पिंग Video Viral; शाहबाज, घरामीची शतकं...

Marathi News Live Updates : भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी तेलंगणातील हैदराबाद येथील टाटा लॉकहीड मार्टिन एरोस्ट्रक्चर्स लिमिटेड प्रकल्पाला भेट दिली

‘चॅनेलमधल्या कुणाचातरी राग...’ दयाने सांगितलं CID बंद होण्याचं खरं कारण; म्हणाला-

SCROLL FOR NEXT